kareena kapoor

‘प्रेग्नेंसी बायबल’ या पुस्तकात तैमूरच्या जन्माविषयी बोलताना करीना म्हणाली की सुरुवातीला आईच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तिला अनेक अडचणी आल्या.

    बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खानचं लवकरच ‘प्रेग्नेन्सी बायबल’ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. काही दिवसांपूर्वी करीनाने तिच्या या आगामी पुस्तकाची घोषणा केली होती. या पुस्तकात करीनाने जेव्हा तिने तैमूरला जन्म दिला त्यावेळी ती एक परिपूर्ण आई नव्हती असे सांगितले आहे.

    करीना आणि सैफला दोन मुलं आहेत. मोठा मुलगा तैमूर असून त्याचा जन्म हा २०१६ मध्ये झाला होता. ‘प्रेग्नेंसी बायबल’ या पुस्तकात तैमूरच्या जन्माविषयी बोलताना करीना म्हणाली की सुरुवातीला आईच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तिला अनेक अडचणी आल्या.

    “सुरुवातीला मी एक परिपूर्ण आई नव्हती. सुरुवातीला मला तैमूरची शी कशी साफ करावी किंवा त्याचे डायपर कसे काढायचे ते माहित नव्हते. बर्‍याच वेळा त्याची शी बाहेर यायची कारण मी त्याला डायपर व्यवस्थीत घालू शकत नव्हती. पुढे करीना म्हणाली, “हे तुमच्या सोयीसाठी आहे. जे तुम्हाला सोईसकर वाटेल ते करा. जेव्हा आईला स्वत:वर विश्वास असतो तेव्हा मुलांनाही ते जाणवते. म्हणूनच मी इतक्या लवकर कामावर परतले. मला माहित होते की फक्त एक आई असणं ही तिची ओळख नाही. त्यामुळेच गरोदर असताना देखील ती काम करत होती आणि आता प्रसूतीनंतर देखील ती लवकरच कामावर येणार आहे.”

    करीना लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीना आमिर खानसोबत दिसणार आहे. सध्या आमिर लडाखमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.