kareena kapoor khan zebra print dress

अभिनेत्री करिना(kareena kapoor khan troll) काल रात्री तिची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरासोबत करण जोहरच्या घराजवळ दिसली. यावेळी करिनाने झेब्रा प्रिंटचा ड्रेस(kareena kapoor zebra print dress) घातला होता. ज्यात ती खूपच विचित्र दिसत होती. करिना कपूरचे झेब्रा प्रिंटच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आल्यानंतर करिनाला खूप ट्रोल करण्यात आले.

    अभिनेत्री करिना कपूर खानने नुकताच आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. बाळ लहान असतानाही करिना कपूर बाहेर फिरताना पाहून लोकांनी तिच्यावर टीका केली. आता वेगळ्या कारणामुळे करिना कपूर टीकेची धनी झाली आहे. करिना काल रात्री तिची बेस्ट फ्रेंड अमृता अरोरासोबत करण जोहरच्या घराजवळ दिसली. यावेळी करिनाने झेब्रा प्रिंटचा ड्रेस घातला होता. ज्यात ती खूपच विचित्र दिसत होती.

    या झेब्रा प्रिंटच्या ड्रेससोबत तिने काळा मास्क, ग्रे स्लिंग पर्स आणि ब्लॅक हिल्सचे सँडल्स घातले होते.

    करिना कपूरचे झेब्रा प्रिंटच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आल्यानंतर करिनाला खूप ट्रोल करण्यात आले. एका ट्रोलरने तर असे लिहिले की, आज मला मुंबईत करिना कपूरच्या रुपात झेब्रा दिसला. तसेच अन्य एकाने करिनाने हा ड्रेस घालून अतरंगी ड्रेस घालणाऱ्या रणवीर सिंगला टक्कर दिली आहे, असे म्हटले आहे.

    करिना कपूर खान लवकरच लाल सिंह चढ्ढा या चित्रपटामध्ये आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत आमिर खानही झळकणार आहे. करिनाला बाळ होण्याआधीच या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले होते. आता हा चित्रपट रिलीज व्हायचा बाकी आहे.