Kareena Taimur teaches pottery; Watch the cute video of Kareena-Taimur

आज तैमुर अली खानचा ४ था वाढदिवस, त्याच्या वाढदिवसानिमित्त आई करिनाने एक खास घोषणा केली आहे. यापुढे करिना अभिनेत्री म्हणून नाही तर लेखिका म्हणून ओळखली जाणार आहे. कारण तैमुरच्या वाढदिवासाचं औचित्यसाधून करिनाने आपल्या पहिल्या पुस्तकाची घोषणा केली आहे. Pregnancy Bible असं या पुस्तकाचं नाव आहे.

करिनाचं पहिलं पुस्तक हे गरोदरपणावर आहे. आई होणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक खास ठरणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत करिनाने याविषयी माहिती दिली आहे.

करिना म्हणते, माझ्या पुस्तकाची Pregnancy Bible for all moms to be ची घोषणा करण्यासाठी आजचा दिवस एकदम परफेक्ट आहे. यात मी सर्व गोष्टींबद्दल लिहिलं आहे. अगदी मॉर्निंग सिकनेस, डाएट ते फिटनेस, तुम्ही कधी हे पुस्तक वाचाल असं मला झालय.

करिना लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात करिना, सैफने ही गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली.