करिनाचा दुसरा मुलगा जेहचा फोटो अखेर आला समोर, नेटकऱ्यांनी केली या व्यक्तीशी तुलना!

करीनाच्या एका फॅन पेजने हा फोटो शेअर केला आहे ज्यात करीना तिच्या मुलासोबत खेळताना दिसत आहे. एक फोटो करीनाचा मोठा मुलगा तैमुर तर दुसरा मुलगा जेह सोबत.

     अभिनेत्री करिना कपूर खान सध्या तिच्या नव्या पुस्तकामुळे चर्चेत आली आहे. करिनाने नुकतच तिच्या ‘प्रेग्नन्सी बायबल’ हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. पण या पुस्तकामुळे काही वाद आता समोर आले आहे. करिनाविरोधात अनेक ठिकाणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तर आता आता करिनाच्या मुलाचा फोटो समोर आला आहे.

    करीनाच्या एका फॅन पेजने हा फोटो शेअर केला आहे ज्यात करीना तिच्या मुलासोबत खेळताना दिसत आहे. एक फोटो करीनाचा मोठा मुलगा तैमुर तर दुसरा मुलगा जेह सोबत. अनेकांनी हा सेम टू सेम तैमुर दिसत असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच करीनाच्या दुसऱ्या मुलाचं नाव समोर आलं होत. तिने त्याचं नाव जेह असं ठेवलं आहे. तर करीनाने जेहच्या जन्मापासूनच त्या मिडियापासून दूर ठेवलं आहे. तर त्याचा कोणता फोटोही समोर आला नव्हता.

    तैमुरच्या मीडियातील प्रचंड वावरानंतर करीनाने दुसऱ्या मुलाला यासगळयापासून दूरच ठेवलं आहे. तर आपल्या गर्भवती पणातील सगळ्या क्षणाचं तिने तिच्या पुस्तकात वर्णन केलं आहे. पण या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.