तैमुर झाला दादा, सैफीना पुन्हा झाले आई- बाबा, नवीन घरात बाळाच्या आगमनाची तयारी झाली!

करिना व सैफवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. दुस-या मुलाच्या जन्माआधी करिना व सैफ नव्या अलिशान घरात शिफ्ट झाले आहेत. याच नव्या घरात करिनाच्या बाळाचे जंगी स्वागत होणार आहे. करिनाच्या डिलिव्हरीसाठी सैफ अली खाननेही आपल्या कामत ब्रेक घेतला आहे.

    तैमूर अली  खान आता दादा झाला आहे.  सैफ अली खान व करिना कपूर यांच्या घरी पुत्ररत्न जन्मले आहे. करिना कपूरने आज गोंडस मुलाला जन्म दिला. काल रात्री करिनाला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २०२० ऑगस्टमध्ये दुस-यांदा आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी सैफिनाने शेअर केली होती. त्यादिवसांपासून चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.

    करिना व सैफवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. दुस-या मुलाच्या जन्माआधी करिना व सैफ नव्या अलिशान घरात शिफ्ट झाले आहेत. याच नव्या घरात करिनाच्या बाळाचे जंगी स्वागत होणार आहे. करिनाच्या डिलिव्हरीसाठी सैफ अली खाननेही आपल्या कामत ब्रेक घेतला आहे.

    करिनाने आपल्या प्रेग्नंसीकाळात पूर्णत:आनंद घेतला. यावेळी तीने आपलं काम अजिबात थांबवलं नाही. अनेक जाहीराती तिने या दरम्यान केल्या. ती सोशल मीडियावरही खूप सक्रीय होती. तीने चाहत्यांना तीचे अपडेट सतत देत होती.

    करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे तिच्या वाट्याचे शूटींग बेबोने कधीच पूर्ण केले आहे. याशिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ या सिनेमातही ती झळकणार आहे.