kareena - taimur

स्टार किड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो सैफ आणि करिना कपूरचा तैमूर. तैमूरबद्दल प्रत्येक त्याच्या चाहत्यांकडे असते. त्याची प्रत्येक अक्शन कॅमेरात टिपायला सगळेच तयार असतात.  आज तैमूरचा चौथा वाढदिवस. अभिनेत्री करीना कपूर खानने मुलाच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. यानिमित्त करीनाने त्याचा एक फोटो आणि व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. या पोस्टद्वारे करीनाने तैमुरबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) 

करिना पोस्टमध्ये म्हणते,

वयाच्या चौथ्या वर्षी तुझ्याकडे असलेला दृढनिश्चय, आत्मसमर्पण आणि लक्षकेंद्रीत करण्याची वृत्तीपाहून मला फार आनंद होतोय. माझ्या मुलावर देवाचा आर्शीवाद असो. पण बर्फवृष्टीचा आनंद घेण्याला, फुलांशी खेळायला, इकडे-तिकडे बागडायला आणि वाढदिवसाचा संपूर्ण केक खायला विसरू नकोस. तुझ्या स्वप्नांचा पाठलाग कर आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुला आनंद देणाऱ्या गोष्टी नक्की कर. तुला तुझ्या अम्माशिवाय जास्त कोणीच, कधीच प्रेम करू शकत नाही. टिम, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा”

करीनाने तैमुरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तो प्राण्यांसोबत खेळताना, गवत उचलताना, बर्फात खेळताना पाहायला मिळत आहे. तैमुरचा स्टारडम एखाद्या मोठ्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्याचे फोटो आणि व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वीच तैमूरचा फोटोग्राफरवर वैतागलेला व्हिडिओ व्हायरल झालेला. तर काही दिवसांपूर्वी डलहौजी येथे एका हॉटेलमध्ये पाककौशलही तैमुरचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते.