जेव्हा लहान भावासाठी तैमुर शेफ बनतो, घरातल्या कामाचाही उचलली जबाबदारी!

करीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तैमूरच्या हातात एक ट्रे दिसतोय. या ट्रेमध्ये चिमुकल्या तैमूरने बाहुल्यांच्या आकाराची बिस्किटं बनवली आहेत. ही कुकिस् बेक करण्यासाठी तयार आहेत.

    बॉलिवूडमधील स्टार किड्सपैकी सर्वाधिक लोकप्रिय म्हणजे सैफिनाचा मुलगा तैमुर. सोशल मीडियावर तैमुरला, त्याच्या फोटो आणि व्हिडिओला सर्वाधिक पसंती मिळते. तैमुरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

    सध्या करीना तैमूरचे फोटो शेअर करताना दिसतेय. नुकताच करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तैमूरचा एक फोटो शेअर केला आहे. काही मिनिटांमध्येच तैमूरचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

    करीनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तैमूरच्या हातात एक ट्रे दिसतोय. या ट्रेमध्ये चिमुकल्या तैमूरने बाहुल्यांच्या आकाराची बिस्किटं बनवली आहेत. ही कुकिस् बेक करण्यासाठी तयार आहेत. या फोटोला करीनाने एक कॅप्शन दिलंय. ” एकाच फ्रेममध्ये माझ्या आयुष्यातील पुरुष.. खूप छान दिसतंय हे” अशा आशयाचं कॅप्शन तिने या फोटोला दिलंय. तसचं “शेफटीम”, “फेव्हरेटबॉय” असं हॅशटॅग तिने या फोटोला दिले आहेत.