दुसऱ्या प्रेग्नंसीनंतर करिना कपूरच्या शरीराची लागली वाट, चेहऱ्यावरही आल्यात सुरकूत्या, म्हातारी म्हणत नेटकरी करतायत ट्रोल!

२१ जूनला करीनाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत करीना योग करताना दिसत आहे.

    २१ फेब्रुवारी २०२१ ला करीनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. तैमूरच्या जन्मानंतर काही काळातच मोठी मेहनत घेऊन करीनाने वजन कमी केलं होतं. यंदा मात्र करीनात चाहत्यांना काहीच फरक जाणवलेला नाही. पण करीनाने पुन्हा ट्रान्सफॉर्मेशनसाठी सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामवर करीनाने तिचे काही वर्कआउटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. असं असलं तरी करीनात कोणताही बदल झालेला दिसत नसल्याने नेटकऱ्यांनी करीनाला ट्रोल केलंय.

    २१ जूनला करीनाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोत करीना योग करताना दिसत आहे. २००६ सालापासून म्हणजचे ‘टशन’ आणि ‘जब वी मेट’ या सिनेमाच्या वेळी योग सुरु केल्याच करीना या पोस्टमध्ये म्हणाली आहे. या पोस्टमध्ये ती म्हणाली, “दोन मुलांना जन्म दिल्यानंतर आणि आता प्रसूतीच्या चार महिन्यांनंतर मी खूप थकले होते. पुन्हा सर्व सुरु करताना खूप त्रास होत आहे. मात्र आज मी पुन्हा एकदा हळूहळू सुरुवात करत आहे.”

    करीनाने शेअर केलेल्या फोटोत तिचा नो मेकअप लूक पाहायला मिळतोय. मात्र या लूकमुळेच अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. एक युजर म्हणला, “तिचा चेहरा पहा, किती वय दिसतंय.” तर दुसरा युजर म्हणाला, “कोण अफवा पसरवतंय की तू खूप सुंदर दिसतेस” तर आणखी एक युजर म्हणाला, “तू ७५ वर्षांची आजीबाई दिसतेयस”