चुकून का होईना रणधीर कपूर यांनी शेअर केला तैमुरच्या भावाचा फोटो, डिलीट केल्यानंतरही होतोय तुफान व्हायरल

रणधीर कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करीनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला होता. या फोटोत तैमूरच्या धाकट्या भावाचे दोन फोटो कोलाज करून रणधीर यांनी शेअर केले होते.

    अभिनेत्री करीना कपूर खानने फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या मुलाला जन्म दिला. करीना आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाबद्दल आता पर्यंत कोणतीही माहिती दिलेली नाही. अद्याप बाळाचा फोटो, आणि नावही जाहीर केलं नाही. मात्र, आता आजोबा रणधीर कपूर यांनी चुकून त्यांच्या नातवाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

    रणधीर कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करीनाच्या दुसऱ्या मुलाचा फोटो शेअर केला होता. या फोटोत तैमूरच्या धाकट्या भावाचे दोन फोटो कोलाज करून रणधीर यांनी शेअर केले होते. मात्र, त्यांना तो फोटो सोशल मीडियावर शेअर करायचा नव्हता. कारण, शेअर केल्याच्या कही क्षणातच त्यांनी तो फोटो डीलीट केला.

    रणधीर यांनी हा फोटो डीलीट केल्या नंतर, नेटकऱ्यांनी लगेच तैमूरच्या धाकट्या भावाचे फोटो व्हायरल होत आहे. या आधी करीनाने तिच्या धाकट्या मुलाचा फोटो ‘जागतिक महिला दिन’च्या निमित्ताने शेअर केला होता. मात्र, त्या फोटोत तैमूरच्या धाकट्या भावचा चेहरा दिसला नाही.