‘कारखानीसांची वारी’ निघाली १२व्या लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हला!

'कारखानीसांची वारी'च्या टीमनं सिनेप्रेमींना ही गोड बातमी दिली आहे. २४ जून रोजी लंडनमधील सिनेल्युमीयरमध्ये आणि २७ जूनला जेनेसीस सिनेमामध्ये 'कारखानीसांची वारी' दाखवण्यात येणार आहे

    काही चित्रपटांची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. ‘कारखानीसांची वारी’ हा मराठी चित्रपट अशांपैकीच एक आहे. पुन्हा एकदा लॅाकडाऊनमुळं प्रदर्शित होऊ न शकलेला हा चित्रपट आता लंडनला निघाला आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार हा चित्रपट यंदा २३ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता, पण लॅाकडाऊनमुळं कारखानीसांनी पुन्हा हुलकावणी दिली आणि वारी पुढं गेली. रोड ट्रीपवर आधारीत असलेला हा चित्रपट १२व्या लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हलसाठी सिलेक्ट झाला आहे.

    ‘कारखानीसांची वारी’च्या टीमनं सिनेप्रेमींना ही गोड बातमी दिली आहे. २४ जून रोजी लंडनमधील सिनेल्युमीयरमध्ये आणि २७ जूनला जेनेसीस सिनेमामध्ये ‘कारखानीसांची वारी’ दाखवण्यात येणार आहे. नाईन आर्चर्स पिक्चर्स कंपनी आणि एबीपी स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन मंगेश जोशी यांनी केलं आहे.

    अर्चना बोऱ्हाडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात अमेय वाघ, मृण्मयी देशपांडे, डॅा. मोहन आगाशे, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी, वंदना गुप्ते, शुभांगी गोखले, प्रदीप वेलणकर, अजीत अभ्यंकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.