kangana ranaut

करणी सेनेचा कंगनाला पाठिंबा (Karni Sena supports ) असून ९ सप्टेंबर रोजी करणी सेनेचे काही सदस्य मुंबई विमानतळावर कंगनाच्या सुरक्षेसाठी उपस्थित राहतील.मुंबई दौऱ्यादरम्यान कंगनाच्या सुरक्षेची जबाबदारी उचलणार असल्याचं करणी सेनेचे जीवन सोलंकी यांनी स्पष्ट केलं.

अभिनेत्री कंगना रणौतने (actress Kangana Ranaut) मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे एक नवीन वाद सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तसेच सर्व क्षेत्रातून तिच्या या वक्तव्याला विरोध केला जात आहे. विरोध करणाऱ्यांना आव्हान देण्यासाठी कंगना येत्या ९ सप्टेंबर रोजी आज मुंबईत (Mumbai) येत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनाला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकेकाळी कंगनाचा विरोध करणारी करणी सेना आता तिला पाठिंबा देत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करणी सेनेचा कंगनाला पाठिंबा (Karni Sena supports ) असून ९ सप्टेंबर रोजी करणी सेनेचे काही सदस्य मुंबई विमानतळावर कंगनाच्या सुरक्षेसाठी उपस्थित राहतील.मुंबई दौऱ्यादरम्यान कंगनाच्या सुरक्षेची जबाबदारी उचलणार असल्याचं करणी सेनेचे जीवन सोलंकी यांनी स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर मुंबई विमानतळावरून तिच्या घरापर्यंत करणी सेनेचे सदस्य तिला सुरक्षा पुरवणार आहेत