कोरोनातून बरा होताच कार्तिक आर्यनने खरेदी केली महागडी कार, इटलीहून मुंबईत आणण्यासाठी ५० लाख रुपये भरला अतिरक्त कर

या व्यतिरिक्त कार्तिककडे स्वतःच्या मालकीची बीएमडब्ल्यूची गाडी आहे, जी त्याने २०१७ मध्ये खरेदी केली होती आणि नुकतीच २०१९ मध्ये कार्तिकने आपल्या आईला मिनी कूपरच्या कार भेट म्हणून दिली, जी त्याच्या आईची आवडती कार आहे.

  नुकताच कार्तिक आर्यन कोरोनातून बरा झाला आहे. कोरोनातून बरा होताच कार्तिकने आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. कार्तिक आर्यन याला गाड्यांची प्रचंड आवड आहे. तो बर्‍याचदा वेगवेगळ्या कारमधून फिरताना दिसतो. आता कार्तिकने साडेचार कोटींची लॅम्बोर्गिनी कार विकत घेतली आहे. ही कर भारतीय नसून, त्याने थेट इटलीमधून भारतात आणली आहे.

  View this post on Instagram

  A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

  कार्तिकने त्याच्या स्वप्नातली कार इटलीहून मुंबईत आणण्यासाठी ५०  लाख रुपये अतिरक्त कर भरले आहेत आणि तीन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याला त्याच्या गाडीची डिलिव्हरी मिळाली आहे.

  View this post on Instagram

  A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

  या व्यतिरिक्त कार्तिककडे स्वतःच्या मालकीची बीएमडब्ल्यूची गाडी आहे, जी त्याने २०१७ मध्ये खरेदी केली होती आणि नुकतीच २०१९ मध्ये कार्तिकने आपल्या आईला मिनी कूपरच्या कार भेट म्हणून दिली, जी त्याच्या आईची आवडती कार आहे.

  View this post on Instagram

  A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

  कार्तिक आर्यन कियारा अडवाणी आणि तब्बू यांच्यासह आगामी ‘भूल भुलैया २’ चित्रपटाचे शूटिंग करत होता. याशिवाय त्यांचा ‘धमाका’ हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. कार्तिक जान्हवी कपूरसोबत करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मध्येही दिसणार आहे.