‘दोस्ताना २’ ‘फ्रेडी’ नंतर आणखी एका बिग बजेट चित्रपटामधून कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता!

या चित्रपटासाठी कार्तिकची फिल्ममेकर आनंद राय यांच्यासोबत शेवटच्या टप्प्यातील बातचीत सुरू होती. या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील कार्तिकने वाचली होती.

  अभिनेता कार्तिक आर्यनचे सध्या वाईट दिवस सुरू आहेत की काय असा प्रश्न सध्या त्याच्या चाहत्यांना पडला आहे. सुरवातीला करण जोहरने कार्तिक आर्यनला ‘दोस्ताना २’ मधून बाहेर काढलं, त्यानंतर बॉलिवूडमधल्या किंग खानच्या प्रोडक्शनचा चित्रपट ‘फ्रेडी’मधून कार्तिकला बाहेरलाचा रस्ता दाखवण्यात आला. त्यापाठोपाठ आता आणखी एका बड्या बजेटच्या चित्रपटातून कार्तिक आर्यनला काढून टाकण्यात आलंय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

  फिल्‍ममेकर आनंद एल राय यांनी अभिनेता कार्तिक आर्यनला एका अनटाइटल्‍ड गॅंगस्‍टर फिल्‍मसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र आता तो या चित्रपटाचा हिस्सा बनू शकणार नाही. या चित्रपटासाठी कार्तिकची फिल्ममेकर आनंद राय यांच्यासोबत शेवटच्या टप्प्यातील बातचीत सुरू होती. या चित्रपटाची स्क्रिप्ट देखील कार्तिकने वाचली होती. परंतू चित्रपट साईन करण्यापूर्वीच. अभिनेता कार्तिकला या चित्रपटातून बाहे करण्यात आलय. या मागचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

  आनंद राय यांच्या चित्रपटातून कार्तिकला बाहेर करण्यात आल्यानंतर त्याच्या जागी आता अभिनेता आयुष्यमान खुराना घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. यापुर्वी आनंद राय आणि आयुष्यमान खुराना यांनी एकत्र ‘शुभ मंगल सावधान’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात काम केलेलं. त्यामुळे पुढे जाऊन कार्तिकच्या जागी आयुष्यमान खुरानाचं नाव जरी जाहीर झालं तरी जास्त आश्चर्य वाटणार नाही.