करण जोहरनंतर ‘या’ सुपरस्टारने आपल्या चित्रपटातून कार्तिक आर्यनला दाखवला बाहेरचा रस्ता!

कार्तिकने साइनिंगची रक्कमही घेतली होती, परंतु क्रीएटिव्ह मतभेदांमुळे कार्तिकने ती रक्कम परत केली आहे.या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी यावर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती.

  बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अभिनेता कार्तिक आर्यनचे लाखो चाहते आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांच्या एक्झिटमुळे तो प्रचंड चर्चेत आहे. कार्तिकला दिग्दर्शक करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटात रिप्लेस केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कार्तितला एक मोठा झटका लागला आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊस मधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊससोबत कार्तिक एक चित्रपट करणार होता. 

   

  View this post on Instagram

   

  A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

  कार्तिकने साइनिंगची रक्कमही घेतली होती, परंतु क्रीएटिव्ह मतभेदांमुळे कार्तिकने ती रक्कम परत केली आहे.या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी यावर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दिग्दर्शक अजय बहल करणार होते. तर शाहरुखचे रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊस या चित्रपटाची निर्मिती करणार होते. या चित्रपटात कार्तिकसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार होती. 

   

  View this post on Instagram

   

  A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

  हे दोन चित्रपट हातातून गेले असले तरी कार्तिक ‘भूल भूलै २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री कियारा आडवाणी आहे. अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या एका चित्रपटात कार्तिक दिसणार आहे.