mithun chakrborty

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत बिघडल्याने आगामी द काश्मीर फाइल्स या चित्रपटाचं शुटींग थांबवण्यात आलय. नोव्हेंबरपासून मसूरीमध्ये या चित्रपटाचं शूटींग सुरू होतं. शनिवारी आऊटडोर शुटींगदरम्यान मिथुन चक्रवर्ती अचानक सेटवर कोसळले. त्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी चित्रपटाचं शुटींग थांबवलं.

चित्रपटातील साहसदृश्यांचं शूटींग सुरू होतं मात्र फूड पॉइझनिंगमुळे त्यांना उभंसुद्धा राहता येत नव्हतं. थोडा वेळ ब्रेक घेऊन त्यांनी त्यांचं शूटिंग पूर्ण केलं. त्यांना आराम करण्याची खूप विनंती केली पण चाळीस वर्षांहून अधिक करिअरमध्ये कधीच कोणत्या चित्रपटाच्या सेटवर आजारी पडलो नसल्याचं त्यांनी मला सांगितलं. काहीही झालं तरी शूटिंग थांबलं नाही पाहिजे यावर ते ठाम होते”, असं विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं.

त्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांच्यावरील भागाचं शूटिंग झाल्यानंतर त्या दिवसाचं काम बंद करण्यात आलं. त्यांना पुरेसा आराम मिळावा याची पूर्ण काळजी घेण्यात आली. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात अनुपम खेर, पुनित इस्सार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.