जियाला मिळाला फिटनेस मंत्र, सेटवर आहाराची अशी घेतेय काळजी!

सुशीलाला नेहमीच तंदुरूस्‍त व मोहक राहायला आवडते आणि मी वास्‍तविक जीवनात तिच्‍याकडूनच प्रेरणा घेतली आहे. तंदुरूस्‍त राहण्‍यासाठी आवश्‍यक काळजी घेणं अत्‍यंत महत्त्वाचं आहे.

    छोट्या पडद्यावरील ‘काटेलाल अॅण्‍ड सन्‍स’ या मालिकेनं एका प्रेरणादायी पटकथेसह प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. सोनी सबवरील या मालिकेमध्‍ये सुशीलाची भूमिका साकारणारी जिया शंकर तिच्‍या तंदुरूस्‍त व मोहक भूमिकेसह प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. फिटनेसबाबत जिया शंकरने म्हणाली की, ती तिच्‍या फिटनेसकडं बारकाईनं लक्ष देते. डाएटचं काटेकोरपणे पालन करते. माझा नेहमीच तंदुरूस्‍त व आरोग्‍यदायी राहण्‍यावर विश्‍वास आहे. माझ्या भूमिकेच्‍या फिटनेसप्रती आवडीमधून मला माझ्या फिटनेसप्रती प्रेरणा मिळाली आहे.

    सुशीलाला नेहमीच तंदुरूस्‍त व मोहक राहायला आवडते आणि मी वास्‍तविक जीवनात तिच्‍याकडूनच प्रेरणा घेतली आहे. तंदुरूस्‍त राहण्‍यासाठी आवश्‍यक काळजी घेणं अत्‍यंत महत्त्वाचं आहे. आजच्‍या काळात ही काळाची गरज बनली आहे. आपण काही मुलभूत काळजी घेतली की, आपल्‍या फिटनेसप्रती अर्धी लढाई जिंकतो. भरपूर पाणी पिणं आणि रात्री योग्‍य झोप घेणं. स्‍वत:ला हायड्रेटेड ठेवण्‍यासाठी अधिकाधिक ताजी पेयं, पाणी सेवन केलं पाहिजे.

    माझा तंदुरूस्‍त व आरोग्‍यदायी राहण्‍यावर दृढ विश्‍वास आहे आणि म्‍हणूनच मी स्‍वत:हून माझा आहार बनवण्‍याला पसंती देते. दररोज व्‍यायाम करणं अत्‍यंत महत्त्वाचं असून, योगा हा व्‍यायामाचा सर्वोत्तम प्रकार आहे.