विकी कौशल नंतर अभिनेत्री कतरिना कैफला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि गोविंदा यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सोबतच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया, रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख आणि गायक आदित्य नारायण या कलाकारांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

  राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. अभिनेता विकी कौशल पाठोपाठ आता अभिनेत्री कतरिना कैफला देखील करोनाचा संसर्ग झाला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

  कतरिनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे करोनाचा संसर्ग झाल्याचे सांगितले आहे. ‘माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया करोना चाचणी करुन घ्या’ असे तिने म्हटले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

   

  दरम्यान, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि गोविंदा यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सोबतच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री आलिया, रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख आणि गायक आदित्य नारायण या कलाकारांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)