Kaun Banega Crorepati season 12 starts from 28 september 2020 on sony entertainment television
कौन बनेगा करोडपती (KBC) चे बारावे पर्व, स्पर्धेच्या नियमात झालेत हे बदल

मुंबई : देवियों और सज्जनों, सज्ज व्हा, ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC)च्या १२व्या सत्रासाठी! तब्बल दोन दशकांचे अतुलनीय यश आणि लोकप्रियता लाभलेले KBC हे फक्त भारतीय टेलिव्हिजनवरील गेम चेंजर नाही, तर माणसामधली ज्ञानाची ताकद अधोरेखित करणारा हा शो आहे. आपल्या १२व्या सत्रात दुहेरी संदेश घेऊन हा शो परतत आहे. सध्याच्या महामारीच्या काळात हा शो अधिक भव्य आणि सरस असणार आहे आणि त्यातील स्पर्धकांना आणि प्रेक्षकांनाही सध्याच्या सेटबॅककडे अधिक दणक्यात पुनरागमन करण्यासाठीचा एक स्टेपिंग स्टोन म्हणून बघण्याची नवी दृष्टी देणारा असेल. स्टुडिओनेक्स्टद्वारा निर्मित आणि महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे सूत्रसंचालन लाभलेला हा शो, कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) सप्टेंबर २८ पासून सुरू होत असून दर सोमवार ते शुक्रवार तो रात्री ९:०० वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून (sony entertainment television) प्रसारित होईल.

KBC च्या १२व्या सत्रासाठी यावेळी पहिल्यांदाच झालेल्या डिजिटल ऑडिशन्सना जबरदस्त प्रतिसाद मिळाला, ज्यातून देशाच्या काना-कोपर्‍यात वसलेल्या लोकांमधील प्रचंड आशा, स्वप्ने आणि आकांक्षा दिसून येतात. एक शो म्हणून KBC या मंचाने आपल्या क्षमता दर वर्षी अधिकाधिक रुंदावल्या आहेत. या कार्यक्रमाने सामान्य माणसाला सर्वात पुढे ठेवून आत्मविश्वास, धैर्य, चिकाटी, आशावाद आणि बुद्धिमत्ता या त्याच्या गुणांचा गौरव केला आहे.

कार्यक्रमाचा गाभा तोच ठेवून KBC च्या १२व्या सत्रात, सध्याच्या परिस्थितीस अनुरूप असे काही बदल करण्यात आले आहेत. COVID-19 च्या परिस्थितीत सरकारने दिलेल्या सुरक्षेच्या मार्गदर्शिका आणि प्रोटोकॉल यांना अनुसरून २० वर्षांमध्ये पहिल्यांदाच KBCच्या स्टुडिओमध्ये प्रेक्षक असणार नाहीत.

स्टुडिओमधील प्रेक्षक या खेळात हॉटसीटवर असलेल्या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी ‘ऑडियन्स पोल’ या लाइफलाइनच्या माध्यमातून मदत करत असतात. यावर्षी ऑडियन्स पोल या लाइफलाइनच्या ऐवजी ‘व्हिडिओ-अ-फ्रेंड’ ही लाइफलाइन असेल. इतर ३ लाइफलाइन्स- ५०:५०, आस्क द एक्स्पर्ट आणि फ्लिप द क्वेश्चन तशाच राहतील. दर आठवड्याला हॉट सीटवर बसण्यासाठी फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट मध्ये चढाओढ करणार्‍या स्पर्धकांची संख्या १० ऐवजी कमी करून यंदा ८ करण्यात आली आहे.

२८ सप्टेंबरपासून सोनी LIV वर KBC प्ले अलॉन्गसह सहभागी होऊन आणि स्पर्धकाच्या बरोबरच आपल्याही ज्ञानाची ताकद आजमावून प्रेक्षक देखील या शो चा आनंद आणि रोमांच अनुभवू शकतील.

KBC चे १२वे सत्र वेदांतु आणि टाटा सॉल्ट द्वारा को-पावर्ड आहे. असोसिएट प्रायोजक आहेत IDFC FIRST बँक, LIC, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सीमेंट, क्विकहील, सेन्सोडाईन आणि निस्सान. भारतीय रिझर्व बँक या कार्यक्रमाची स्पेशल पार्टनर आहे.

पुन्हा पुन्हा शोध घेणे ही यशाची गुरुकिल्ली आहे, असे म्हणतात. आणि याच धर्तीवर आम्ही कौन बनेगा करोडपतीच्या 12व्या सत्राची तयारी सुरू केली. कौन बनेगा करोडपती हा भारतातील त्याच्या गेल्या २० वर्षांच्या इतिहासात एक ब्रँड बनला आहे. सध्याची परिस्थिती पाहता, या वर्षी डिजीटल नोंदणीच्या माध्यमातून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक होता. आणि हे आकडे दर्शवितात की, लोक या महामारीने लादलेल्या ‘न्यू नॉर्मल’चा स्वीकार सहजपणे करू लागले आहेत. यंदाचे थीम ‘जो भी हो, सेटबॅक का जवाब कमबॅक से दो’ हे या शोमध्ये आलेल्या स्पर्धकांनी सांगितलेल्या त्यांच्या कहाण्या आणि अनुभव यांना अनुलक्षून आहे. त्यांच्या या अनुभवांमधूनच लक्षावधी प्रेक्षकांपुढे प्रेरणादायी उदाहरणे सादर होतील.

आशीष गोलवलकर, प्रमुख- कंटेण्ट, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि डिजीटल बिझनेस

KBC च्या १२व्या सत्रासाठी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम विचारात घेऊन या सेटमध्ये काही अनुरूप फेरफार करण्याचे आम्ही ठरवले आहे, पण त्याच वेळी या जागेचा प्रभाव कमी होणार नाही, याकडेही लक्ष दिलेले आहे. स्टुडिओमध्ये प्रेक्षकवर्ग उपस्थित राहणार नसल्याने ऑडियन्स पोल या लाइफलाइनच्या जागी यावेळी व्हिडिओ-अ-फ्रेंड ही लाइफलाइन दाखल करण्यात आली आहे. या तयारीनंतर, आम्हाला खात्री आहे की श्री. अमिताभ बच्चन यांची जादू आणि स्पर्धकांच्या पडद्यावरील आणि प्रत्यक्ष जीवनातील प्रवासाचे अनुभव प्रेक्षकांना खिळवून ठेवतील. हा शो अजूनही विशेषच आहे आणि या सत्रातही त्याची लोकप्रियता आणखी वाढेलच.

इंद्रनील चक्रवर्ती, प्रमुख – स्टुडिओनेक्स्ट

२०२० या वर्षात KBC हा शो २० वर्षाचा होईल आणि ‘आम आदमी’ सोबतच्या त्या ‘खास खेल’ची आणि ‘अद्वितीय होस्ट’ची जादू पुन्हा निर्माण करत या खडतर वर्षातील सर्व आव्हानांवर मात करून पहिल्यापेक्षा जास्त मजबूत होऊन तो आता पुनरागमन करत आहे. सद्य परिस्थितीतील वास्तवाचे भान ठेवताना या शो ने त्यातील मजा मात्र कायम राखली आहे आणि मन आणि हृदयाला साद घालत तो जीवनाला खराखुरा स्पर्श करत आहे. प्रेक्षक स्पर्धकांसोबतचा खेळ पाहता पाहता स्वतःही खेळू शकतील आणि पूर्वीपेक्षा आता जास्तच रक्कम जिंकू शकतील.

सिद्धार्थ बसू, कन्सल्टन्ट- KBC