KBC मध्ये सहभागी होणं पडलं महागात, रेल्वे विभाग करणार ‘ही’ कारवाई कारण…

देशबंधू पांडे सहभागी झालेले एपिसोड २६ आणि २७ ऑगस्ट रोजी प्रसारित झाला आहे. त्यांनी केबीसीमध्ये १० प्रश्नांची योग्य उत्तरे दिली

    छोट्या पडद्यावरील सगळ्यांचा आवडता कौन बनेगा करोडपती हा शो चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमात हॉट सीटवर रेल्वे अधिकारी देशबंधू पांडे बसले होते. ते या कार्यक्रमात होते म्हणून ते प्रचंड खूष होते पण आता त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे.

    देशबंधू पांडे हे राजस्थानच्या कोटा रेल्वे विभागाच्या स्थानिक विभागाचे कार्यालय अधीक्षक आहेत. तैनात असलेल्या देशबंधू पांडे यांना रेल्वे प्रशासनाने चार्जशीट दिली असून त्यांच्या वेतनवाढीवर तीन वर्षांसाठी बंदीही घातली आहे.

    या कारणांमुळे घातली बंदी

    गेल्या काही दिवसांपासून कोणतीही माहिती न देता गायब होणे, केबीसीमध्ये सहभागी होत असल्याची पूर्व माहिती न देणे असे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत. देशबंधू हे रजा मंजूर झाल्याशिवाय ९ ते १३ ऑगस्टपर्यंत बेपत्ता होते आणि त्यांचे असे वागणे कामाकडे दुर्लक्ष करण्यासारखे असल्याचे चार्जशीटमध्ये म्हटले आहे.

    देशबंधू पांडे सहभागी झालेले एपिसोड २६ आणि २७ ऑगस्ट रोजी प्रसारित झाला आहे. त्यांनी केबीसीमध्ये १० प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. रेल्वे प्रशासनाद्वारे केल्या जाणाऱ्या या कारवाईला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे.