सात कोटीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भातील ‘तो’ प्रश्न विचारला आणि हिमानीने गेम क्वीट केला!

सात कोटींसाठी हिमानीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही.

  कौन बनेगा करोडपती या या शोच्या १३ व्या पर्वाला सुरूवात झाली आहे. पर्वाच्या दुसऱ्याच आठवड्यात पहिली करोडपती स्पर्धक हिमानी बुंदेलच्या रूपाने मिळालाय. सध्या सोनी टीव्हीवर कौन बनेगा करोडपतीचे १३ पर्वात हिमानीने एक कोटी रूपये जिंकले आहेत. एवढी मोठी रक्कम जिंकणारी हिमानी पहिली स्पर्धक आहे. पण सात कोटीच्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्यामुळे तिला गेम क्वीट करावा लागला.

  सात कोटींसाठी हिमानीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. बराच वेळ विचार केल्यानंतर एक कोटींवरुन थेट तीन लाख २० हजारांवर येण्याऐवजी आपण शो क्वीट करुयात असा निर्णय हिमानीने घेतला.

   काय होता प्रश्न

  सात कोटींसाठी हिमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समध्ये सादर केलेल्या प्रबंधाचं शीर्षक काय होतं ज्यासाठी त्यांना १९२३ साली डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली?, असा प्रश्न विचारण्यात आलेला.

  A) द वॉण्ट्स अ‍ॅण्ड मीन्स ऑफ इंडिया

  B) द प्रॉब्लेम ऑफ द रुपी

  C) नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया

  D) द लॉ अ‍ॅण्ड लॉयर्स

  हिमानीने बराच वेळ विचार करून गेम क्वीट केला. या प्रश्नाचं बरोबर उत्तर बी म्हणजेच द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे होतं.