हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आमदारांसह पाहिला चित्रपट

मुख्यमंत्री आणि आमदार चंदीगडच्या अ‍ॅलांटे मॉलमधील सिनेमहॉल येथे चित्रपट पाहण्यासाठी गेले. मेरा फौजी कॉलिंगच्या निर्मात्यांच्या वतीने या चित्रपटाचा प्रीमियर शो हरियाणाच्या सीएम आणि आमदारांसाठी ठेवण्यात आला होता.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क , चंदीगड.

    हरियाणामधील मनोहरलाल सरकारवरील संकट संपले आहे. खट्टर सरकारच्या विरोधात काँग्रेसने बुधवारी विधानसभेत आणलेला अविश्वास प्रस्ताव सपशेल आपटला. अविश्वास ठराव पडल्यामुळे हरियाणाचे मुख्यमंत्री खूप आनंदित आहेत. हा प्रस्ताव फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर गुरुवारी पक्षाच्या आमदारांसह ‘मेरा फौजी कॉलिंग’ चित्रपट पाहण्यासाठी गेले होते.

    मुख्यमंत्री आणि आमदार चंदीगडच्या अ‍ॅलांटे मॉलमधील सिनेमहॉल येथे चित्रपट पाहण्यासाठी गेले. मेरा फौजी कॉलिंगच्या निर्मात्यांच्या वतीने या चित्रपटाचा प्रीमियर शो हरियाणाच्या सीएम आणि आमदारांसाठी ठेवण्यात आला होता. अलिकडेच चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टने चंदीगडमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

    हा विजय महत्त्वाचा

    हा विजय खट्टर सरकारसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण शेतकरी संघटनांच्या वतीने सरकारचे समर्थन करणारे जेजेपी आणि अपक्ष आमदार या अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारपासून दूर जाण्यासाठी सतत दबाव आणत होते.