salman khan

विजय आणि विजय सेथुपती यांची भूमिका असलेल्या तमिळमध्ये हिट झालेल्या 'मास्टर'चे हक्कही सलमानकडे असल्याचं समजतं. आता सलमाननं रवी तेजाच्या 'खिलाडी'च्या हिंदी रिमेकचे हक्कही घेतल्याची माहिती मिळाली आहे.

    बॅालिवूडमध्ये सध्या साऊथच्या चित्रपटांचा रिमेक बनवण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. यामुळं साऊथमध्ये हिट झालेले चित्रपट हिंदी भाषिक प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकाराच्या शैलीत पहायला मिळत आहेत. आजवर अभिनेता सलमान खाननंही साऊथच्या बऱ्याच रिमेकमध्ये काम केलं असून, काही दक्षिणात्य चित्रपटांचे हक्कही विकत घेतले आहे.

    विजय आणि विजय सेथुपती यांची भूमिका असलेल्या तमिळमध्ये हिट झालेल्या ‘मास्टर’चे हक्कही सलमानकडे असल्याचं समजतं. आता सलमाननं रवी तेजाच्या ‘खिलाडी’च्या हिंदी रिमेकचे हक्कही घेतल्याची माहिती मिळाली आहे. ‘खिलाडी’मध्ये दक्षिणात्य सुपरस्टार रवी तेजाने डबल रोलमध्ये धमाल केली आहे. सत्यनारायण कोनेरू यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी सुजीत वासुदेव आणि जीके विष्णू यांनी केली आहे.

    आता हिंदी रिमेकच्या निर्मितीची जबाबदारी पेन स्टुडिओज आणि ए स्टुडिओजने स्वीकारल्याची माहिती मिळाली आहे. सलमानच्या अँगलनं बनणारा ‘खिलाडी’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कितपत यशस्वी होते ते पहायचं आहे.