अर्जुनाच्या भूमिकेसाठी किन्शुक वैद्यने घेतले धनुर्विद्येचे धडे

स्टार भारतची मालिका ‘राधाकृष्ण’ प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.  या मालिकेचा नवीन अध्याय ‘कृष्ण अर्जुन गाथा’ कृष्ण, अर्जुन आणि द्रौपदी यांच्या जीवनातील अनेक गोष्टी लोकांसमोर आणणार आहे. या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता किन्शुक वैद्य आपल्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत घेत आहे.

किन्शुक वैद्य यांनी  सांगितले की, “या कार्यक्रमात पुन्हा एकदा अर्जुनची भूमिका निभावणे माझ्यासाठी खरोखर भाग्याची गोष्ट आहे. घराबाहेर पडून शूटिंग करणे आणि प्रतिभावान कलाकारांसमवेत काम करणे एक अद्भुत योगायोग आहे. स्वयंवराचा आगामी क्रम जिथे अर्जुन धनुष्य उचलून सोन्याच्या माशाच्या डोळ्याला छिद्र पाडण्यासाठी बाण सोडतो आणि त्याचे प्रतिबिंब पाण्यात पाहतो तो एक मूर्तिमंत देखावा आहे.  धनुर्विद्येवर प्रभुत्व मिळविण्यासाठी मी स्टंट करणाऱ्यांसोबत दररोज ३-४ ते तास अभ्यास केला. मला आशा आहे की प्रेक्षकांना माझे काम आवडेल.

यापूर्वीही किन्शुकने अर्जुनच्या भूमिकेत स्वत:ला सिद्ध केले होते. पण यावेळी तो ट्रेंड नेमबाज बनून प्रेक्षकांसमोर येईल. स्टार भारतवर लोकांना किन्शुकचा अभिनय पाहता येईल.