अभिनेत्री होण्याआधी किरण खेर दीपिका पादुकोणच्या वडिलांसोबत राष्ट्रीय स्तरावर खेळल्या आहेत बॅडमिंटन!

किरण खेर याआधी एक उत्तम बॅडमिंटन खेळाडू देखील होत्या. इतकंच नव्हे तर अभिनेत्री दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांच्यासोबत राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळल्या आहेत.

    खासदार, अभिनेत्री किरण खेर यांचा आज ६८ वा वाढदिवस. अभिनेत्री किरण खेर यांनी त्यांच्या फिल्मी करियरमध्ये एका पेक्षा एक दर्जेदार भूमिका केल्या आहेत. किरण खेर या चंदीगडमधील भारतीय जनता पक्षाच्या त्या खासदार आहेत.  पण तुम्हाला माहितेय का त्या उत्तम खेळाडू आहेत. किरण खेर याआधी एक उत्तम बॅडमिंटन खेळाडू देखील होत्या. इतकंच नव्हे तर अभिनेत्री दीपिका पादुकोणचे वडील प्रकाश पादुकोण यांच्यासोबत राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळल्या आहेत.

    किरण खेर यांचे दोन विवाह झाले आहेत. किरण खेर यांनी आधी गौतम बेरी यांच्यासोबत विवाह केला होता. ते एक उद्योगपती आहेत. पण लग्नाच्या काही वर्षातच दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर किरण खेर यांनी अनुपम खेर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली.

    अशी झाली करियरची सुरूवात

    किरण खेर यांनी त्यांच्या फिल्मी करियरची सुरवात ‘आसरा प्यार दां’ या चित्रपटातून केली. १९७३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा एक पंजाबी चित्रपट होता. त्यानंतर किरण खेर यांनी बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम करायला सुरवात केली. ‘देवदास’, ‘खामोश पानी’, ‘मैं हूं ना’, ‘वीर-जारा’ आणि ‘रंग दे बसंती’ सारख्या अनेक चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाची जादू दाखवली आहे.