amitabh bachchan

अभिषेकने सांगितले की श्वेता अभिनेता आमिर खानची देखील फॅन होती. जेव्हा आमिर खानला याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याला आनंद झाला. त्यानंतर तो श्वेताच्या प्रत्येक वाढदिवशी तिला पत्र लिहून पाठवायचा.

  महानायक अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा ही बॉलिवूडमध्ये नसली तरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. तिचे लाखो चाहते आहेत. आज १७ मार्चला श्वेताचा वाढदिवस. कलाकरांपासून ते चाहत्यांनी तिला सोशल मीडिया पोस्टद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by S (@shwetabachchan)

  श्वेता ही बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेता आमिर खानची खूम मोठी फॅन होती. याबाबत आमिर खानला जेव्हा कळाले तेव्हा त्याने श्वेताला पत्र लिहिण्यास सुरुवात केली खुद्द अभिषेक बच्चनेचहा खुलासा केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by S (@shwetabachchan)

  करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये अभिषेकने बहिण श्वेताशी संबंधीत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. “जेव्हा सलमान खानचा ‘मैंने प्यार किया’ चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा श्वेता बोर्डिंग स्कूलमध्ये होती. तिने हा चित्रपट व्हीसीआरवर पाहिला होता. त्यांच्या शाळेत चित्रपट पाहण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे तिने चित्रपट ऑडीओ कॅसेटमध्ये रेकॉर्ड करुन घेतला होता आणि ती कॅसेट ती ऐकायची. इतकच नव्हे तर तिने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर फ्रेंड लिहिलेली कॅप देखील अभिषेकडे मागितली होती” असे अभिषेक म्हणाला होता.

  दरम्यान अभिषेकने सांगितले की श्वेता अभिनेता आमिर खानची देखील फॅन होती. जेव्हा आमिर खानला याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याला आनंद झाला. त्यानंतर तो श्वेताच्या प्रत्येक वाढदिवशी तिला पत्र लिहून पाठवायचा.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by S (@shwetabachchan)