अपूर्वाने तिच्या खास अंदाजात इशा घराघरात पोहचवली!

अपूर्वाने तिच्या खास अंदाजात इशा घराघरात पोहचवली. तिच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुकही केलं जात आहे. आपल्या या भूमिकेविषयी नवराष्ट्रशी मारलेल्या या खास गप्पा.

  काही कलाकार लहान-सहान भूमिकांमध्येही आपलं अस्तित्व सिद्ध करत असतात. त्यांची लहानशी व्यक्तिरेखाही त्या प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची ठरत असते. या लहान भुमिकेतूनही ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशीच एक अभिनेत्री अपूर्वा गोरे. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत अपूर्वा सध्या इशा हे पात्र रंगवते. अपूर्वाने तिच्या खास अंदाजात इशा घराघरात पोहचवली. तिच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुकही केलं जात आहे. आपल्या या भूमिकेविषयी नवराष्ट्रशी मारलेल्या या खास गप्पा.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Apurva (@apurvagore)

  अपूर्वाने ती फुलराणी या मालिकेतून छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली. पण अपूर्वाला खरी ओळख मिळवून दिली ती आई कुठे काय करते या मालिकेतील इशाने. पुण्यात इंजिनिअरिंग करत असताना अपूर्वाला नाटकात काम करण्याची संधी मिळाली. कॉलेजमधून पुरूषोत्तम करंडक, फिरोजीया करंडक अशा स्पर्धांमधून अपूर्वाने एकांकिका करायला सुरूवात केली आणि नंतर पूर्णवेळ या क्षेत्रात काम करण्याचा तिने निर्णय घेतला.

  पहिली ऑडिशन खास

  खरतर मी गाण्याचं ऑडिशन द्यायला कॉलेजमध्ये गेले होते. पण तीथे त्यांनी मला नाटकासाठी ऑडिशन द्यायला लावली आणि माझं सिलेक्शनही झालं. नंतर मी कॉलेजकडून एकांकिका स्पर्धेत भाग घेऊ लागले. कॉलेजची दोन वर्ष इंजिनिअरिंगचा अभ्यास सांभाळून नाटक, गाणं सुरूच होतं. कॉलेडमधून बाहेर पडल्यावर एका कंपनीत जॉबही केला. पण तरीही नाटक सोडवत नव्हतं. अखेर जॉब सोडून संपूर्णवेळ नाटक आणि अभिनयाला द्यायचा हा निर्णय घेतला. त्यानंतर ठिकठिकाणी जाऊन ऑडिशन द्यायला सुरूवात केली. त्या ऑडिशनमधूनच मला माझी पहिली मालिका ‘ती फुलराणी’ मिळाली. जवळपास वर्षभरही मालिका सुरू होती. या मालिकेमुळे कॅमेरा फेसिंगचा अनुभव मला मिळाला. त्यानंतर लगेचच ‘आई कुठे काय करते’ ही मालिका मिळाली.

  इशा काहीशी वेगळी पण…

  इशा आणि अपूर्वात खूप मोठं साम्य आहे. ते म्हणजे आम्ही दोघीही घरातल्या सगळ्यात लहान आणि लाडक्या आहोत. त्यामुळे सगळेच तिची खूप काळजी घेतात. पण असं असलं तरी इशा आणि माझ्या स्वभावात खूप फरक आहे. एखादी गोष्ट समजण्याचा किंवा त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन खूप वेगळा आहे. इशा ही एका रोलर कोस्टर राईडप्रमाणे आहे. तिच्यात अनेक शेड्स आहेत. माझ्या स्वभावाच्या बरोबर विरूद्ध असल्यामुळे मला इशा करताना खूप मज्जा येते.

  त्याचप्रमाणे मालिकेतील इतर कलाकार खूप सिनिअर आणि लोकप्रिय आहेत. पण या सगळ्यांनीच मला खूप सांभाळून घेतलय. मालिकेच्या शुटींगच्या पहिल्या दिवशी मी खूप घाबरलेले होते. पण या सगळ्यांनी मला काही मिनिटातच आपलसं केलं. मी सेटवरही सगळ्यात लहान असल्यामुळे माझे खूप लाड होतात.

  जबरदस्त ऑफस्क्रिन बॉण्डिंग

  मालिका सुरू झाली तेव्हा अनेकांनी मला विचारलं मधूराणी ताई तुझी खरच आई आहे का? किंवा तुम्ही सगळे भावंड खरी वाटता. याच हेच कारण आहे की, ऑफस्क्रीन आम्ही जास्त एकमेकांबरोबर मिक्स झालो. खरतर आम्ही सगळेचजण एकमेकांबरोबर पहिल्यांदा काम करतोय. पण आमचं ऑफस्क्रिन बॉण्डींग इतकं खान आहे की ते ऑनस्क्रीन रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे ही खरोखर एक फॅमिली आहे असं प्रेक्षकांना वाटतं. मी माझ्या मालिकेतल्या बाबांना खऱ्या आयुष्यातही बाबाच म्हणते. तीही मुली प्रमाणे माझी काळजी घेतात, लाड करतात. वेळप्रसंगी ओरडतात सुद्धा.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Apurva (@apurvagore)

  सुमित्रा भावेंची प्रतिक्रीया महत्त्वाची

  आमची मालिका प्रेक्षकांना आवडते हे वेळोवेळी आमच्या पर्यंत ते पोहचवत असतात. पण जेष्ठ लेखिका, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनाही आमची मालिका आवडायची. त्या आवर्जून ही मालिका बघायच्या. माझा एक मित्र सुमित्रा मावशीकडे काम करायचा, त्याने मला सांगितलं की त्यांना ही मालिका आवडते आणि त्यांना माझं कामही आवडतं. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. जेव्हा आपल्याच क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती ज्यांकडे बघत आम्ही काम करतो, त्या मालिका बघतात, त्यांना आपलं काम आवडतं. हे कळल्यावकर खूप छान वाटतं. आणखी काम करण्याची ऊर्जा मिळते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Apurva (@apurvagore)

   

  ‘वागळे की दुनिया’

  आई कुठे काय करते या मालिकेचं शुट सुरू असतानाच मला वागळे की दुनिया या मालिकेसाठी फोन आला. केवळ दोन दिवसाच शूट होतं. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा हिंदी भाषेत काम केलं. खरतर थोडं घाबरले होते पण मालिकेत काम करताना खूप मज्जा आली मला. वागळे की दुनियाची संपूर्ण टीमच खूप कमाल आहे. त्यासगळ्यांनी मला खूप चांगल्याप्रकारे ट्रीट केलं. त्यामुळे आपण कोणत्या वेगळ्या सेटवर आलो आहेत असं वाटलच नाही. 

  आता घरच्यांची आठवण येते

  सध्या लॉकडाऊनमुळे आम्ही बाहेरच्या राज्यात येऊन शूट करतोय. सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळून आमचं शूट सुरू आहे. पण बरेच दिवस झाले आम्ही आमच्या घरच्यांना भेटलो नाहीये. त्यामुळे आता सगळ्यांनाच आता फॅमिलीची आठवण येतेय. बाहेरची परिस्थिती बघता कुटुंबाची काळजी जास्त वाटते. पण दुसरीकडे आम्ही या परिस्थितीतही काम करू शकतोय याचा आनंद जास्त आहे. आम्ही सगळे काळजी घेऊन इथे शूट करतोय. लवकरच ही परिस्थिती सुधारेल आणि आपण सगळेच नॉर्मल आयुष्य जगायला सुरूवात करू अशी आशा आहे.