इंजिनियर सौरभचा जीव अभिनयात गुंतला, जाणून घ्या त्याच्या प्रवासाबद्दल!

सुरूवातीला मालिकांमध्ये छोटी-छोटी काम करणारा सौरभ आज मालिकेचा नायक म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

  ‘ईच्छा तेथे मार्ग’ असं आपण नेहमीच म्हणतो, पण काहींनीच ते प्रत्यक्षात उतरवण्यात यश मिळवलं आहे. तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनिअर झालात तरी तुमच्या आतला कालाकार तुम्हाला गप्प बसू देत नाही. आपली आवड, कला जोपासायला प्रत्येकजण मार्ग शोधतोच. असाच एक कलाकार म्हणजेच अभिनेता सौरभ चौगुले. मराठी रंगभूमीशी आपली नाळ जोडत कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून तो मराठी माणसाच्या घराघरात पोहचणार आहे. आपल्या पहिल्या वहिल्या मालिकेचा आनंद सौरभने नवराष्ट्रबरोबर शेअर केला आहे.

  घरी कोणतीही अभिनयाची परंपरा नसताना सौरभचा आजवरचा प्रवास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या आणि अभिनयासाठी स्ट्रगल करणाऱ्या तरूणांना प्रेरणादायी असाच आहे. आपण जिद्दीने काम करत राहयचं कधीना कधी यश मिळतच असं सौरभ आपल्या प्रवासाबद्दल बोलताना आवर्जून सांगतो. सौरभचा प्रवासही सोप्पा नव्हता, जवळपास ५०० ऑडिशन्स त्यांना आत्तापर्यंत दिल्या आहेत. इंडिनियर असणाऱ्या सौरभने २००७ पासून डोंबिवलीच्या अखिल भारतीय नाट्यपरिषद, सुयश नाट्यसंस्थांमार्फत मी नाटकात कामं करायला सुरूवात केली. मागील १२- १३ वर्ष सौरभ थिएटरमध्ये काम करतोय. अखेर सौरभ इंजिनिअरींगचा जॉब सोडून पुर्णवेळ या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीला मालिकांमध्ये छोटी-छोटी काम करणारा सौरभ आज मालिकेचा नायक म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

  अभिनयाबरोबरच कॅमेरा आणि फोटोग्राफिची आवड असल्यामुळे सौरभे रहेजामधून फिल्ममेकिंगचा कोर्स केला. त्यानंतर त्यानंतर त्याने अनेक शॉर्टफिल्म आणि वेबसिरीजसाठी सिनेमोटोग्राफर म्हणून काम पाहिलं. पण काहीवेळा आर्थिक अडचणींना त्याला सामोरं जावं लागलं. यासाठी त्याने अनेक ठिकाणी नोकरीही केली. पण अभिनयात जीव अडकल्यामुळे सौरभने नोकरी सोडून अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

  बाबांच्या ऑफिसमध्ये ऑडिशन

  ३१ मार्च…हा दिवस मी विसरूच शकत नाही. माझा बाबा त्या दिवशी रिटायर्ड होणार होते. बाबांच्या ऑफिसला आम्हे सगळे गेलो होतो. यावेळी माझ्या हातात या मिलकेची स्क्रिप्ट आली. आणि मला चॅनलने ऑडिशन शूट करून पाठवायला सांगितली. बाबांच्या रिटायर्डमेंटसाठी सगळे जमले होते अशातच मी ऑडिशन शूट कुठे करणार असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. अखेर मी माझ्या बाबांच्या केबिनमध्ये ऑडिशन शूट करण्याचा निर्णय घेतला. एकिकडे त्यांचा सेंडॉफ सुरू होता तर दुरीकडे मी ऑडिशन शूट करत होतो. जवळपास १ तास माझा त्यात गेला. एक मन म्हणत होतं बाबांचा सेंडॉफ अटेंड करूयात तर दुसरं मन ऑडिशन शूट करायला भाग पाडत होतं. अशा परिस्थितीत केलंलं ऑडिशन चॅनलला आवडलं. काही चेंजेस करून त्यांनी मला पुन्हा ऑडिशन शूट करून पाठवायला सांगितलं. मला आणखी एका मिळालेल्या संधीमुळे मी प्रचंड खूश होतो. ..आणि मला मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली.

  सौरभच्या विरूद्ध मल्हार…

  या मालिकेत मी मल्हार खानविलकर हे पात्र साकारतोय. माझ्या स्वभावाच्या अगदी विरूद्ध ही भूमिका आहे. सौरभ खूप वेगळा आहे. मला माणसं जोडायला प्रचंड आवडतात, त्याचबरोबर मी खूप इमोशनल पण आहे. पण मल्हार अतिशय वेगळा आहे तो खूप गर्विष्ट आहे. तो अजिबात इमोशनल नाहीये. त्याने शून्यात स्वत:चा मोठा बिझनेस सुरू केला आहे. त्याला त्याच्या बिझनेसचा प्रचंड अभिमान आहे. तर दुसरीकडे नायिका अंतरा जी अभिनेत्री योगिता चव्हाण साकारते. ती अतिशय प्रेमळ, नाती जोडणारी सगळ्यांच मन राखणारी आहे. घरच्या परिस्थितीमुळे रिक्षा चालवून तीने घराचा आर्थिक भार उचलला आहे. एक अभिमानी मुलगा आणि स्वाभिमानी मुलगी या दोघांची जुगलबंदी प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

  पहिल्या दिवशी गट्टी झाली

  मालिकेची टीम प्रचंड भारी आहे. काही मिनिटातच आमची एकमेकांशी चांगली गट्टी जमली. प्रोमो शूटसाठी मी आणि योगिता पहिल्यांदा एकत्र भेटलो होतो. पण पहिल्या भेटीतच आम्ही खूप गप्पा मारल्या. एकमेकांविषयी जाणून घेतलं. एकमेकांचं स्ट्रगल शेअर केलं. आम्ही सगळेच फॅमिली म्हणून काम करतोय. त्यामुळे आमचं ट्यूनिंगही चांगलं जमलं आहे. त्याचा फायदा आम्हाला सीन शूट करताना होतो. आमचं ट्यूनिंग पडद्यावर खूप चागंलं दिसतं.

  बाबांची कौतुकाची थाप

  आजपर्यंत मी खूप छोटे मोठे रोल केले. त्यामुळे मालिकेला कसा प्रतिसाद मिळतोय? आपल्या भूमिकेकडे प्रेक्षकांच लक्ष आहे का? याचा फार विचार कधी केला नाही. पण पहिल्यांदाच मालिकेत नायक म्हणून समोर येत असल्यामुळे प्रेक्षकांची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मालिकेचा माझा प्रोमो जेव्हा रिलीज झाला तेव्हा प्रोमोला मिळणाऱ्या प्रतिक्रिया बघून मी भारावून गेलो. या क्षेत्रातील अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया आल्या. प्रोमो खूप छान झालाय, आम्ही दोघेही खूप छान दिसतो. हे सगळं ऐकल्यावर आपलं काम त्यांच्या पर्यंत पोहचतय याचा जास्त आनंद झाला. सगळ्यात जात खूष माझे आई-बाबा होते. माझे बाबा कधीच कोणती मालिका बघत नाही. ज्या दिवशी माझी भूमिका असयाची तेवढ्या पुरती मालिका बघायचे. त्यावेळी छान एवढीच प्रतिक्रिया त्यांनी मला दिली होती. पण आता फक्त प्रोमो बघितल्यावर पहिल्यांदा माझ्या बाबांच्या तोंडून माझं भरभरून कौतुक ऐकलं. तो आनंद वेगळाच होता.

  प्राणी मित्र सौरभ…

  रस्त्यावरच्या जखमी कुत्र्यांना इंजेक्शन देणं, त्यांची काळजी घेणं इथून प्राणी मित्र व्हायला सुरूवात झाली. त्यानंतर मी वाईल्ड लाईफ रेस्क्यू करायला शिकलो. मी माझ्या आयुष्यात पहिला रेस्क्यू केलेला पक्षी म्हणजे घुबड. त्यानंतर मी अक्षरश: पक्षांच्या प्रेमात पडलो. त्यानंतर मी हळूहळू साप पकडायला शिकलो. गेले ११ वर्ष मी हे काम करत आहे. मला या कामातून खूप समाधान मिळतं. एखाद्या पक्षाला माझ्यामुळे जीवनदान मिळालं तर तो दिवस माझ्या आयुष्यातला खूप खास ठरतो.