‘हॅलो ना पब्लिक’, ‘आभ्या डार्लिं…ग’ या हटके डायलॉग मागची गम्मत, हृषिकेशने असा उभा केला दौलत!

आपल्या युनिकनेसमुळे प्रेक्षकांच्या मनात भरलेल्या हृषिकेशने ‘नवराष्ट्र’ बरोबर शेअर केला त्याचा खास ‘दौलत’.

    ‘हॅलो ना पब्लिक’, ‘आभ्या डार्लिं…ग’, ‘मिस नाशिक आम्ही तुमचे आशिक’ हे डायलॉग आता प्रेक्षकांच्या तोंडपाठ झाले आहेत. खरतर मालिका म्हटलं की नायक आणि नायिकांबरोबर ओघानेच खलनायक हा आलाच. मग कटकारस्थानं आली, नायक- नायिकेला छळणं आलं. मग आपूसकच प्रेक्षक खलनायकाला शिव्यांची लाखोली वाहतात. पण ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील खलनायक ‘दौलत’ म्हणजेच हृषिकेश शेलार हा एकमेव खलनायक प्रेक्षकांचा आवडता बनला आहे. त्याचे डायलॉग, त्याची वेशभूषा या सगळ्यांच्याच प्रेक्षक अक्षरश: प्रेमात पडले आहेत. मालिकेत आपल्या खास शैलीत दौलत उभा करणं याचं श्रेय मालिकेच्या लेखिकेप्रमाणे अभिषेकलाही जातं. आपल्या युनिकनेसमुळे प्रेक्षकांच्या मनात भरलेल्या हृषिकेशने ‘नवराष्ट्र’ बरोबर शेअर केला त्याचा खास ‘दौलत’.

    अभ्यासात ॲवरेज असणाऱ्या हृषिकेशला  सोसायटीतल्या गणेशोत्सवामुळे अभिनयाची आवड लागली. गणेशोत्सवात, शाळेच्या गॅदरींगमध्ये त्याने केलेल्या कामाचं कौतुक होऊ लागलं. आपण अभ्यासात जर शिक्षकांचा, घरच्यांचा मार खात असलो तरी नाटकातील भूमिका पाहून सगळे आपलं कौतुक करतायत हे त्याच्या लक्षात आलं आणि हृषिकेशची अभिनयातली रूची आणखीनच वाढली. त्यानंतर नाट्यशिबारात सहभाग घेतला आणि बालनाट्यांमध्ये छोट्या छोट्या भूमिका करायला सूरवात झाली. नंतर १० वी, १२ वी झाल्यानंतर कॉलेजला ॲडमिशन घेतली खरी पण आतली अभिनयाची आवड त्याला शांत बसू देत नव्हती. कॉलेजमध्ये ॲडमिशन होताच हृषिकेशने नाटकाच्या ग्रृपला जॉईन झाला आणि पुढे अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पुणे एमबीएचं शिक्षण घेत असताना कॅम्पसमधून त्याला जॉबचीही ऑफऱ आली. जॉब सुरू झाला पण पुन्हा अंगातला अभिनयचा किडा काही शांत बसू देत नव्हता. अखेर राजीनामा देत पुर्णवेळ अभिनयाकडे लक्ष दयायचं असा निर्णय झाला आणि हृषिकेशने मुंबई गाठली….

    अभिनेता म्हणून प्रवास सुरू….

    नोकरी सोडल्यानंतर मी मुंबईत आलो. मुंबई युनिव्हर्स सिटीच्या ॲकॅडमी ऑफ थेएटर्स आर्ट मधून मी डिग्री घेतली. २ वर्षांचा कोर्स पुर्ण केल्यानंतर मला विजय केंकरे यांच्या शांतेच कार्ट चालू आहे या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. या नाटकात भाऊ कदम, विशाखा सुभेदार, प्रियदर्शन जाधव असे दिग्गज कलाकार होते. या सगळ्यांकडून मला खूप काही शिकता आलं. मला माझ्या पहिल्याच व्यवसायिक नाटकातून प्रचंड अनुभव मिळाला. त्यानंतर सहजच कलर्स मराठीवरील ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेसाठी ऑडिशन दिली. त्यातपण सुरूवातीला छोटी भूमिका होती. पण ती भूमिका प्रेक्षकांना आवडली आणि माझा मालिकेतला रोल वाढला. त्यानंतर ‘छत्रीवाली’, ‘सावित्री ज्योती’ या मालिकेत भूमिका केल्या. त्यानंतर लॉकडाऊन लागला आणि काम थांबलं. त्यानंतर पहिला लॉकडाऊन संपला आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेसाठी विचारणा झाली आणि मी नाशिक गाठलं.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Hrishikesh. (@hrishishelar)

    ‘नायक नही खलनायक हूँ मै’

    ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत केवळ नायक, नायिकाच नाही तर इतर सगळ्याच भूमिका खूप वर्क झाल्या आहेत. मुळात मालिकेची गोष्टच खूप सुंदर आहे. त्यामुळे परफेक्ट भट्टी जमून आली आहे. मालिकेतील प्रत्येक भूमिकेची निवडही परफेक्ट झाली आहे. त्यामुळे काम करतानाही खूप मज्जा येतेय. खरतर दौलत एवढा प्रेक्षकांना आवडेल असं कधीच वाटलं नव्हतं. तो केवळ खलनायक नाहीये. तो बाहेर जरी वळू असला तरी घरात तो तेवढाच आई-बाबांच्या शब्दाबाहेर नाहीये. त्याच्या आईबरोबरचं त्याचं रिलेशन वेगळं आहे. शिवाय तो एका मुलीवर प्रेमही करत असतो. तर असा अशाच अनेक शेड्स या भूमिकेला आहेत. त्यामुळे हा टिपीकल व्हिलन नाहीये. आमच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णीने खूप वेगळ्या प्रकारे हा खलनायक समोर आणला आहे. माझ्यामते म्हणूनच प्रेक्षकांचा दौलत खलनायक असला तरी आवडता झाला आहे.

    ‘हॅलो ना पब्लिक…..’

    आज दौलेतचे फेमस झालेले डायलॉग कधीच लिहून आलेले डायलॉग नव्हते. ते भूमिका रंगवताना आपण नेहमी वेगवेगळे प्रयोग करतो. त्यातलाच हे डायलॉग. एकदा एखाद्या सीनला वेगळा डायलॉग घेतला की तो प्रेक्षकांना आवडतो. तो आवडला असं लक्षात आलं तर तो पुन्हा पुन्हा पुढच्या सीनला घेतला गेला. ‘हॅलो ना पब्लिक’ हा डायलॉग माझ्या बँकेच्या पहिल्या सीनमध्ये मी घेतला. नुसतीच एन्ट्री घेण्याएवजी हा डायलॉग घेत मी सुरूवात केली. नंतर तो डाय़लॉग सगळ्यांनाच आवडायला लागला. आमच्या लेखिकेलाही तो खूप आवडला. नंतर स्क्रीप्टमध्येच तो डायलॉग लिहून येऊ लागला. त्यानंतर असच एकदा बोलता बोलता मी ‘आभ्या डार्लिंग हीज हियर’ असं म्हटलं होतं.  त्यानंतर त्यात ही थोडा बदल केला, तो ही प्रेक्षकांना आवडला. अशापद्धतीने खास दौलत स्टाईल डायलॉग तयार झाले.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Hrishikesh. (@hrishishelar)

    शर्यत होणार पण….

    प्रेक्षकां इतकेच आम्ही ही शर्यत कधी होणार याची वाट बघतोय. खरतर खूप आधीच मालिकेत ही शर्यत पार पडली असती. पण लॉकडाऊन लागला आणि शर्यतीचा सीन शूट करणं शक्य झालं नाही. कारण शर्यतीचा सीन हा खूप मोठ्या प्रमाणात शूट केला जाणार आहे. कारण मालिकेत दिड- दोन महिने ज्याप्रमाणे शर्यतीवर बोलणं झालं त्याला न्याय देईल असा तो सिक्वेन्स शूट होणं गरजेचं आहे. या कोविडच्या काळात तो सीन शूट करणं शक्य नाही. मोठं मैदान, मोठा मॉब लागले. त्यामुळे आम्ही अशा करतो की लवकरच ही परिस्थिती बदलेल आणि तुम्ही ज्या प्रतिक्षेत आहात ती शर्यत होईल. मला खात्री ती शर्यत शूट करताना आणि प्रेक्षकांना बघताना खूप मज्जा येईल.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Hrishikesh. (@hrishishelar)

    सीनमधून तयार झालं खास बॉण्डींग

    दौलत आणि मिस नाशिक हे खास समिकरण आता तयार झालं आहे. त्याचप्रमाणे मी आणि पुजा आमची ऑफस्क्रीनही तेवढाच खास बॉण्ड तयार झाला आहे. सुरूवातीला पुजा जेव्हा मालिकेत आली तेव्हा ती काहीशी या भाषेला धरून घाबरली होती. मला ही भाषा जमेल की नाही बोलणारी पुजा आता याचमुळे सगळ्यांची लाडकी झाली आहे. ती कामल काम करते. त्याचप्रमाणे अभ्या- लतिका हे दोघेही खूप चांगले कलाकार आहेत. या दोघांची एनर्जी लेवल प्रचंड आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सतत यांचे सीन शूट होत असतात पण ते कधीच दमत नाहीत. त्याचप्रमाणे अभ्या म्हणजेच समीरने कलर्स मराठी पुरस्कारादरम्यान पुरस्कार स्विकारताना मला स्टेजवर बोलवलं आणि तो पुरस्कार माझ्याबरोबर शेअर केला तो क्षण माझ्यासाठी खूप खास होता. एका सहकालाकाराची किंमत ठेवणं, एवढ्या मोठ्या कार्यक्रमादरम्यान हे लक्षात येणं. यातूनच त्याचा मोठेपणा समजतो.