हॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट जगात ठरले लयभारी, बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई!

हॉलीवूडच्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. त्यातील अशाच काही चित्रपटांचा आढावा आपण आता घेणार आहोत.

  कोरोना महामारी, लॉकडाऊन या सगळ्याचा परिणाम जरी चित्रपटसृष्टीवर झाला असला तरी यापूर्वी आलेल्या अनेक चित्रपटांनी आजपर्यंत बॉक्सऑफिसवर रसिकांच्या मनावर राज्य केलं आहे. या चित्रपटांनी बक्कळ पैसा ही कमवला आहे. त्यात बहुतांशी चित्रपट हे हॉलीवूडचेच आहेत. हॉलीवूडच्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. त्यातील अशाच काही चित्रपटांचा आढावा आपण आता घेणार आहोत.

  अवेंजर्स

  दोन वर्षापूर्वी अवेंजर्स एंडगेम प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात २० हजार ३३२ कोटी कमावले. आता हा रेकॉर्ड अवतारनं तोडला आहे. आणि अवेंजर्स हा सर्वाधिक कमाईच्या बाबतीत दुस-या क्रमांकावर आला आहे. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन जोई रुसो आणि एंथोनी रुसो यांनी केलं होतं.

  अवतार

  अवतार हा हॉलीवूडचा प्रसिध्द चित्रपट. त्याला जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. चीनमध्ये हा चित्रपट दोनदा प्रदर्शित झाला. तुम्हाला आतापर्यत अवतार सिनेमानं केलेल्या बिझनेसचा आकडा सांगितल्यास धक्का बसेल. या चित्रपटानं २०  हजार ३६८ कोटी म्हणजे चक्क २.८०२ बिलियन डॉलर एवढी प्रचंड कमाई केली आहे. एवढी कमाई करणारा तो जगातील एकमेव चित्रपट आहे.

  ज्युरासिक वर्ल्ड

  २०१५ मध्ये दिग्दर्शक जॉस व्हेडन यांनी द अवेंजर्स मधून ९७९९.१४ कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. त्यावेळी ती सर्वाधिक कमाई करणारी सहावी फिल्म होती. या चित्रपटाला भारतातुनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय २०१५ मध्ये आलेल्या ज्युरासिक वर्ल्डनं १०८३७.४६ कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतातही या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती.

  स्टारवॉर्स

  द फोर्स अवेकेंस हा २०१५  मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शक जेजे अबराम्स होते. त्याने बॉ़क्स ऑफिसवर १३३६८.३७ कोटी रुपये कमावले होते. सायन्स फिक्शन प्रकारातील हा चित्रपट होता. या चित्रपटानं पूर्ण जगभरात १३ हजार ३३६ कोटी रुपयांचा व्यापार केला होता.

  टायटॅनिक

  १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. त्याचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन होते. टायटॅनिक नावाचे एक महाकाय जहाज एका हिमनगाला धडकून समुद्राच्या तळाला जाते. त्यात असणारे प्रवासी कशाप्रकारे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात हे त्यात दाखविण्यात आले होते. अवेंजर्सच्या अगोदर टायटॅनिक हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.