समृद्धीच्या दृष्टिकोनातून किर्ती, वाचा ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेच्या नायिकेचा प्रवास!

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत साकारणाऱ्या किर्तीच्या दृष्टिकोनातून 'नवराष्ट्र'शी बातचित करताना समृद्धीनं मालिकेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

  पावसाळा नुकताच सुरू झाल्यानं पहिल्या पावसातील मृद्गंध सर्वांनी अनुभवला असेलच, पण मागील काही दिवसांपासून फुलालाही मातीचा सुगंध सुटल्याचं छोट्या पडद्यावरील प्रेक्षक अनुभवत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेली ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरली आहे. यातील नायक-नायिकेचा संघर्ष रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. यात नायिकेच्या भूमिकेत असलेल्या समृद्धी केळकरनं पहिल्या भागापासून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाच्या सुगंधानं मोहीत केलं आहे. या मालिकेत साकारणाऱ्या किर्तीच्या दृष्टिकोनातून ‘नवराष्ट्र’शी बातचित करताना समृद्धीनं मालिकेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

  मूळात एक उत्तम डान्सर असलेली समृद्धी आज ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेद्वारे घराघरात पोहोचली आहे. घरी अभिनय किंवा नृत्याचा वारसा नसतानाही समृद्धीनं मेहनतीनं मिळवलेलं हे यश अनेकांना प्रेरणादायी ठरावं असं आहे. आपल्या नृत्याच्या प्रवासाबाबत समृद्धी म्हणाली की, वयाच्या पाचव्या वर्षापासून मी डान्स करत असून, कथ्थक विशारद आहे. मी नृत्याचे क्लासेसही घेते. डान्सर असल्यानं लहानपणापासून नवरसांपासून बऱ्याच गोष्टी ठाऊक आहे. नाटुकली वगैरे करणं वेगळं असतं आणि आॅडीशन देऊन काम करणं यात फरक असतो. त्यामुळं जस्ट स्वत:ला टेस्ट करण्याचा विचार केला. आॅडीशन्स दिल्या आणि मालिकांमध्ये सिलेक्ट झाले. ठाण्यामध्ये निवेदिता रानडे यांच्याकडून नृत्याचं शिक्षण घेतलं. लीना भोसले शेलार यांच्याकडून लावणी, वेस्टर्न वगैरे डान्स फॅार्म शिकलेय. आमच्या क्लासेससाठी परफॅार्म केलं आहे, पण डान्सर म्हणून मोठे प्रोग्रँम्स केलेले नाहीत. डान्समध्ये आणखी अभ्यास करायचा आहे. क्लासिकलसोबतच इतरही डान्स फॅार्म शिकायचे आहेत. सध्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेवरच लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे सिनेमे स्वीकारलेले नाहीत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by samruddhi kelkar (@samruddhi.kelkar)

  ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेतही समृद्धीनं आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे, पण ‘फुलाला सुगंध मातीचा’मधील व्यक्तिरेखा वेगळी असल्याचं सांगत ती म्हणाली की, त्यात खूप वेगळं कॅरेक्टर होतं. यात मी सुशिक्षीत तरुणीची भूमिका साकारतेय. आयपीएस बनणं हे हिचं स्वप्न आहे. या निमित्तानं वेगळं कॅरेक्टर साकारण्याची संधी मिळाल्यानं खुश आहे. आता मालिकेला मिळत असलेला रिस्पाँस पाहून समाधान वाटतंय. लोकांच्या प्रतिक्रीया, मेसेजेस पाहून आनंद होतोय. बऱ्याच जणांचे कॅाल्स येतात. सध्या मालिकेत मास्टर शेफचा ट्रॅक सुरू आहे. तो पाहून काहीजण आॅनलाईन पाककला शिकण्याचा प्रयत्न करताहेत. स्पर्धांचं आयोजन करत आहेत. हे पाहून भारावून गेलेय. आजच्या कोरोनाच्या संकाटाच्या काळातही लोकं मालिका आणि मी साकारलेली भूमिका एन्जॅाय करत आहेत. काम थांबलेलं नाही. मनोरंजन बंद झालेलं नाही. घरात बसलेल्या लोकांना एन्टरटेन करू शकतो याचं वेगळं समाधान आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by samruddhi kelkar (@samruddhi.kelkar)

   

  दुसऱ्यांदा मुख्य भूमिकेत
  ‘फुलाला सुगंध मातीचा’ माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या मालिकेच्या निमित्तानं मला दुसऱ्यांदा लीड करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळं मनात संमिश्र भावना आहे. प्रत्येक कलाकाराला मुख्य भूमिकेत काम करायचं असतं, पण योगायोगानं म्हणा किंवा नशीबानं मी आॅडीशन दिली आणि सिलेक्ट झाले. किर्ती हे कॅरेक्टर समजूतदार आहे. तिला बऱ्याच गोष्टी समजतात. शिक्षणाचा ध्यास आहे. शिक्षणाचं महत्त्व ठाऊक आहे. शिक्षणामुळे माणूस सज्ञान होतो, जबाबदार बनतो, समामाजात मान मिळतो. तिनं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असून, आयपीएस बनायचं आहे. तिचं स्वप्न समजून न घेता तिचा भाऊ न शिकलेल्या मुलाशी लग्न लावून देतो. त्यानंतर तिच्या आयुष्यात काय घडतं त्याचा प्रवास म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’. आता किर्ती घरात चांगली रुळली आहे. सर्वांना तिनं आपलंसं केलं आहे. जबादाऱ्या सांभाळतानाच माणसंही जपतेय.

  सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न
  ही मालिका नेहमी कोणता ना कोणता सामाजिक संदेश देत असते. कचरा का बाहेर टाकू नये? त्यामुळं आजार पसरतो हे सांगण्यासाठी मालिकेत कठपुतलीचा खेळ मांडण्यात आला होता. लहान सहान गोष्टीही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम किर्तीच्या माध्यमातून केलं जात आहे. अजूनही मुलींना तितका फ्रीडम नाही. त्यामुळं मुलींना शिकू द्या, त्यांना पुढे जाऊ द्या, स्वत:चं नाव कमवू द्या असा संदेश देते. आज किर्ती शिकलेली असल्यानं ती नवऱ्याला शुभमला मास्टर शेफमध्ये मदत करतेय. समोरचा इंग्रजीत काय बोलतोय ते ट्रान्सलेट करून सांगू शकतेय. हे सर्व शिक्षणामुळं शक्य होत आहे. त्यामुळं प्रत्येक मुलीला शिकवलं पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी मालिकेद्वारे सांगितल्या जातात.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by samruddhi kelkar (@samruddhi.kelkar)

  परस्पर भिन्न व्यक्तिमत्त्वांचं आव्हान
  प्रत्येक कॅरेक्टर हे वेगळं आव्हान असतं. किर्ती आणि समृद्धीमध्ये खूप फरक आहे. जशी किर्ती लोकांना शांत दिसतेय तशी समृद्धी मुळीच नाही. काही गुण सेम आहेत. कोणतीही गोष्ट मॅच्युअरली हँडल करणं ही दोघींमध्ये समान आहे. मी खूप धांगडधिंगा करणारी असून, चंचल आहे. मला मस्त लाईफ एन्जॅाय करायला आवडतं, पण किर्तीचं तसं नाही. त्यामुळं दोघीही टोटली डिफरन्ट आहेत. जशी मी नाही तसं कॅरेक्टर प्ले करत आहे. त्यामुळं जी लोकं मला ओळखतात त्यांच्या लगेच दोघींच्या स्वभावांमधील तफावत लक्षात येते. लोकांना माझ्या दोन छटा पहायला मिळत असल्याचं ऐकून समाधान वाटतं. जे आहे ते करण्यापेक्षा जे नाही ते करायला खूप मेहनत घ्यावी लागते.

  शुभमच बाजी मारणार!
  शुभम उत्तम शेफ असून, त्यानं मास्टर शेफमध्ये सहभागी व्हायला हवं असं मी त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते. ही खूप मोठी स्पर्धा असल्यानं मला ते काय बोलतात ते कळणार नाही असं त्याचं म्हणणं असतं, पण मी सांगते की धीर सोडू नको. मी आहे ना या एका वाक्यावर तो स्पर्धेत सहभागी होतो. स्पर्धा जसजशी पुढे जाणार तसतशी आव्हानं वाढणार असल्यानं शोबद्दलची माहिती मी त्याला मराठीत सांगत असते. त्यामुळं त्याला कॅाम्पिटीशनमध्ये मदत होते. आतापर्यंत आम्ही सेमी फायनलपर्यंत पोहोचल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. शुभम स्वयंपाकात उत्तम आहे. केवळ काय करायचं ते सांगायचं आहे. किर्ती हे काम शिक्षणामुळं करू शकतेय. हर्षदसोबत काम करताना खूप मजा येतेय. त्यानं माझ्यापेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केल्यानं त्याला खूप अनुभव आहे. त्यामुळं काही अडलं, काही समजलं नाही तर सांगतो किंवा काही अॅडीशन घेऊया का असं विचारतो. मनमोकळेपणाने सजेशन्स देतो.