नम्रता ताईमुळे आज मला महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना हासवायची संधी मिळाली- शिवाली परब

आज जर युथ फेस्टिव्हल माझ्या आयुष्यात आलं नसतं तर ती कदाचीत सरकारी नोकरी करत असते. त्यामुळे युथ फेस्टिव्हल हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणायला हरकत नाही.

  नृत्याच्या आवडीतून सीएचएम कॉलेजमधून युथ फेस्टिव्हलमध्ये भाग घेणारी शिवाली परब सध्या ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’मधून महाराष्ट्राला हसवतेय. युथ फेस्टिव्हलपासून सवाई या सगळ्याच स्पर्धांमध्ये शिवाली हे नाव गाजलं. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘हास्य जत्रा’ शिवाली आता घराघरात पोहचली आहे. नृत्यांगना होण्याच स्वप्न घेऊन आलेली शिवाली विनोदाची कोणतीही माहिती नसताना आज संपूर्ण महाराष्ट्राला हसवतेय. आपला आजवरचा प्रवास ‘नवराष्ट्र’सोबत शेअर करताना शिवालीने युथ फेस्टीव्हल ते ‘हास्य जत्रा’ बद्दल सांगितलं आहे.

  शिवालीने खूप कमी वेळात आपलं स्थान हास्य जत्रेत प्रस्थापित केलं ते केवळ मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर. काही दिवसातच शिवालीचा स्वत:चा असा चाहता वर्ग तयार झाला आहे. पण या सगळ्याच क्रेडीट अभिनेत्री नम्रता अवटेला देते. एका कार्यक्रमात स्किट करणाऱ्या शिवालीचं काम पाहून नम्रता आवटे या अभिनेत्रीनं तिला हास्यजत्रेसाठी बोलावलं. ‘नम्रताताईनं दिलेल्या संधीमुळे मी आज संपूर्ण महाराष्ट्राला हसवू शकते. मी यासाठी आयुष्यभर तिची आभारी राहेन’, असं शिवाली अवर्जून सांगते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shivali Parab (@parabshivali)

  मला नृत्याची खूप आवड होती. सीएचएम कॉलेजमध्ये असताना लावणी करायची म्हणून मी युथ फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला. ऑडिशनमध्ये त्यांना नृत्य करताना हावभाव आवडले म्हणून त्यांनी मला एकांकीकेत भाग घेण्याचा सल्ला दिला. नृत्य करायला म्हणून आलेली मी एकांकिका, स्किट सगळंच करू लागले. खरतर या काळात मी एका सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता. परिक्षाही दिली. आज जर युथ फेस्टिव्हल माझ्या आयुष्यात आलं नसतं तर ती कदाचीत सरकारी नोकरी करत असते. त्यामुळे युथ फेस्टिव्हल हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणायला हरकत नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shivali Parab (@parabshivali) 

  पहिलं स्कीट विसरूच शकत नाही

  पहिल्या दिवशा मीरारोडच्या स्टुडिओत सकळी ९च्या सुमारास पोहचले. यावेळी किरण डांगे आणि मी अशी जोडी होतो आणि नियती घाटे आणि सचिन गावडे अशी जोडी होती. दुपारपर्यंत स्क्रीप्ट वाचलं सगळी तयारी केली. कारण पहिलं स्कीट असल्यामुळे मनावर थोडं दडपडही होतं. पाठांतर होईल की नाही याचीही भिती होती. हे सगळं मनात सुरू असताना अचानक ३ वाजता आम्हाला सांगितलं की तुमच्या जोड्या बदलण्यात आल्या आहेत. आता मला सचिन गावडेबरोबर स्कीट करायचं होतं. आता माझ्या हातात वेगळं स्कीप्ट होतं. सकाळपासून मी ज्याची तयारी केली त्याचा आता काही उपयोग नव्हता. आता हातात असलेल्या स्कीप्टमध्ये मला ४ वेगवेगळ्या भूमिका करायच्या होत्या. नंतर सगळ्यांनी खूप मदत केली. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे सरांसमोर वाचन झालं. सरांनाही फार आवडलं आणि स्कीट सादर झाल्यावर वा…शिवाली असं सरांनी म्हटल्यावर मला प्रचंड आनंद झाला. पोटात आलेला मोठा गोळा निघून गेला.

  लहानपणापासून मी ज्यांना बघत आले अशा दिग्गज कलाकारांबरोबर मी आता काम करतेय. नम्रता आवटे, प्रसाद खांडेकर, समीर चौगुल,विशाखा सुभेदार,पंढरीनाथ कांबळे हे सगळेच खूप दिग्गज आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना कायमच मला नवनवीन शिकता येत. हास्यजत्रेमुळे अनेक भूमिका मला या मंचावर करता आल्या. कदाचीत मी मालिका करत असते तर एवढ्या भूमिका करायची संधी मला मिळाली नसती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Shivali Parab (@parabshivali)

   

  लेखकांना १०० टक्के क्रेडिट

  विनोदी लेखन करणं हे फार अवघड असतं. एखादा विषय सुचणं आणि त्यावर संपूर्ण विनोदी स्कीट लिहीणं कठीण असतं. प्रसाद दादा असो किंवा समीर दादा सगळेच लेखक खूप मेहनत घेतात. आपलं स्कीट जास्तीत जास्त चांगल व्हावं यासाठी काय करता येईल यावर सगळे चर्चा करतात आणि ते तयार होतं. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे आमच्यासाठी प्रचंड मेहनत घेतात. जेव्हा एखादं नवं स्कीट करायचं असतं तेव्हा आम्ही कोरी पाटी ठेवून जातो. तेच आम्हाला समजावून सांगतात आणि आमच्याकडून करवूनही घेतात. त्यामुळे आमचं स्कीट चांगलं होण्यामागे या लेखकांचा हात आहे.

  हिंदी भाषेचं दडपण

  व्हाट्सऍप लव्ह आणि वेक अपध्ये छोट्या भूमिका केल्यानंतर एका हिंदी मालिकेचा मला एक महत्त्वाचा भाग होता आलं. ‘सरगम की साढेसाती’ या मालिकेत मी गुड्डीची व्यक्तिरेखा साकारली. हिंदी टेलिव्हिजनवर मी पहिल्यांदाच काम करत होते. त्यात संपूर्ण हिंदी भाषा, कारण आपण रोजच्या जीवनात हिंदीचा वापर फारसा करत नाही. त्यामुळे भाषेच दडपण माझ्यावर होतं.

  नवीन कलाकार, वेगळी भाषा या सगळ्याच दडपण पहिल्याच दिवशी सेटवर पोहचल्यावर गायब झालं. मालिकेत मी साकारलेली गुड्डी ही व्यक्तिरेखा खूपच उत्साही आणि बडबडी होती. त्यामुळे पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका मला साकारायला मिळाली.