‘ती’च्या भूमिकेत वावरताना…या पुरूष कालाकारांनी साकारलेली ‘ती’ ठरली सर्वात सुंदर!

आताच्या काळात कथानकाची गरज म्हणून अनेक अभिनेत्यांनी स्त्री पात्र साकारली आहेत. त्यातली अनेक पात्र प्रचंड लोकप्रिय ठरली. त्यातील काही पात्रांची ओळख करून घेऊयात.

    पूर्वी चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये महिला कलाकार काम करत नसत त्यामुळे स्त्री पात्र देखील पुरूष रंगवायचे. रंगमंचावर साड्या नेसून, नटून – थटून पुरूष महिलांच्या भूमिका साकारायचे. यातील मुर्तीमंत उदाहरण म्हणजे बालगंधर्व. कालांतराने महिलाही चित्रपटात, नाटकात भूमिका करू लागल्या. पण आताच्या काळात कथानकाची गरज म्हणून अनेक अभिनेत्यांनी स्त्री पात्र साकारली आहेत. त्यातली अनेक पात्र प्रचंड लोकप्रिय ठरली. त्यातील काही पात्रांची ओळख करून घेऊयात.

    १. विजय चव्हाण-

    मराठी रंगभूमिवरील प्रसिद्ध अभिनेते म्हणून विजय चव्हाण यांच नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांनी अनेक नाटकात आणि चित्रपटात काम केली आहेत. प्रल्हाद केशव आत्रे लिखित मोरूची मावशी या नाटकामुळे विजय चव्हाण यांनी स्त्री पात्र साकारलं. यातील पात्रामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली. जवळपास २ हजार प्रयोग या नाटकाचे झाले. त्यावेळी नोकरी सांभाळून विजय चव्हाण यांनी हे नाटक केलं. या नाटकाच्या नावावर अनेक विक्रम आहेत. विजय चव्हाण यांनी साकारलेली मोरूची मावशी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

    दिलीप प्रभावळकर

    आजपर्यंत अनेक चित्रपट, नाटकांमध्ये भूमिका गाजवणारे जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी वासूची सासू या नाटकात स्त्रीची भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे त्यांनी हसवाफसवी या नाटकातही महिलेचं पात्र साकारलं होतं. दिलीप प्रभावळकर स्त्री वेषात तयार झाले की त्यांना ओळखणं ही कठीण व्हायचं.

    सचिन पिळगावकर

    पुरूषांनी साकारलेल्या स्त्री भूमिका असं म्हटलं की एक नाव अवर्जून घेतलं जातं. ते म्हणजे अभिनेते सचिन पिळगावकर. बालकलाकार म्हणून सचिन पिळगावकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतून सुरूवात केली. सचिन पिळगावकर यांच्या अशी ही बनवाबनवी या चित्रपटात त्यांनी स्त्री भूमिका साकारली होती. या चित्रपट आझही लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत येतो. तुमच्या मनावरच टेन्शन घालवयचं असेल तर हा चित्रपट पुन्हा पुन्हा बघू शकता.

    अशोक सराफ

    अशोक सराफ यांनी आपल्या चाहत्यांच भरभरून मनोरंजन केलं. अशोक सराफ यांनी अनेक मराठी चित्रपटात स्त्री पात्र साकारलं. १९८४ सालच्या गुलछडी या चित्रपटात अशोक सराफ यांनी “नवी नवी नवरी…” या गाण्यात स्त्री वेशात गाण्यावर नृत्य सादर केले होते.

    लक्ष्मीकांत बेर्डे

    अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील पार्वतीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आजही पार्वतीचे डायलॉग आठवले की चेहऱ्यावर हसू उमटतचं. या चित्रपटात पार्वतीची भूमिका लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारली होती. याच चित्रपटात सचिन पिळगावकर यांनी देखील स्त्री पात्र गाजवले होते.

    सुबोध भावे

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सुबोध भावेची ओळख आहे. सुबोधचे मालिकांबरोबर अनेक चित्रपट एकापाठोपाठ आले. यातील २०११ साली आलेल्या ‘बालगंधर्व’ या चित्रपटात बालगंधर्व साकारण्याची संधी मिळाली. आजवरच्या कारकिर्दीत या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने प्रथमच स्त्री भूमिका साकारली.

    वैभव मांगले

    तू सैभाग्यवती हो या मालिकेत अभिनेता वैभव मांगलेने स्त्री पात्र साकारलं होते. मालिकेत असा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला होता. वैभवची मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत होता.