इथे वसलय बाहुबली मधली ‘माहिष्मती’ हे शहर, या सुंदर ऐतिहासिक शहराला एकदा नक्की भेट द्या!

हे शहर आथा मध्य प्रदेशात आहे. इतिहासाच्या अनेक नोंदी आणि कथांमध्ये या शहराचा उल्लेख आहे. त्यावेळी हे शहर एक सामाजिक आणि राजकीय केंद्र होते.

    बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत बाहुबलीचा नंबर कायमच वरचा आहे. बाहुबली या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. या चित्रपटातील जवळपास सगळीच पात्र लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली. यामध्ये ‘कटप्पा’, ‘देवसेना’, ‘भल्लालदेव’, ‘शिवगामी’, ‘अवंतिका’, ‘बिजलादेव’ इत्यादी पात्रांचा समावेश आहे.  या चित्रपटाची कथा माहिष्मती या राज्याला केंद्रस्थानी ठेवून तयार केली होती.

    ‘बाहुबली’मध्ये दाखवलेली ‘माहिष्मती’ काल्पनिक नाही!

    बाहुबली चित्रपटात दाखवलेले हे साम्राज्य काल्पनिक नव्हते, तर वास्तव होते. आता प्रश्न असा पडतो की, जर माहिष्मती काल्पनिक नसेल तर, हे साम्राज्य भारतात नेमके कुठे आहे? इतिहासात नोंदवलेल्या नोंदीनुसार, ‘बाहुबली’ चित्रपटाचे केंद्र असलेल्या माहिष्मती मध्य भारतात स्थित एक मोठे शहर होते. हे शहर आथा मध्य प्रदेशात आहे. इतिहासाच्या अनेक नोंदी आणि कथांमध्ये या शहराचा उल्लेख आहे. त्यावेळी हे शहर एक सामाजिक आणि राजकीय केंद्र होते.

    भारकोशनुसार माहिष्मती चेदी जनपत जिल्ह्याची राजधानी असायची. हे शहर नर्मदा नदीच्या काठावर वसलेले होते. महिष्मतीबद्दल असं म्हटलं जातं की, सध्या ते मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात आहे, जे आता महेश्वर म्हणून ओळखले जाते. खरगोन जिल्ह्यातील महेश्वर हे पुरातन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू यासाठी प्रसिद्ध आहे.

    महेश्वर किल्ला, विठ्ठलेश्वर मंदिर, अहिलेश्वर मंदिर अशा अनेक ऐतिहासिक वास्तू तिथे आहेत. खरगोनचे महेश्वर हे इंदूरपासून सुमारे ९१ किमी. अंतरावर आहे. त्यामुळे अशा सुंदर राज्याला एकदा तरी भेट द्याच.