म्हणून मनोज वाजपेयींनी नाकारला ‘नाईट मॅनेजर’, कारण आलं समोर!

या भूमिकेबद्दल बोलणी झाल्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं या सिरीजला उशीर झाला. लॅाकडाऊनचा परिणाम मनोजच्या तारखांच्या वेळापत्रकावर झाला.

    आजवर कायम विविधांगी भूमिका साकारणारा अभिनेता मनोज बाजपेयी पुन्हा एकदा खलनायकी भूमिकेत दिसणार असल्याचं आम्ही यापूर्वीच सांगितलं होतं. ‘द नाईट मॅनेजर’ या ब्रिटिश सिरीजच्या हिंदी रिमेकमध्ये पुन्हा एकदा मनोजचा खलनायकी अभिनय पहायला मिळणार होता, पण आता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ‘द नाईट मॅनेजर’मध्ये तो रिचर्ड रोपर ही भूमिका निभावणार होता.

    या भूमिकेबद्दल बोलणी झाल्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळं या सिरीजला उशीर झाला. लॅाकडाऊनचा परिणाम मनोजच्या तारखांच्या वेळापत्रकावर झाला. आता ‘द नाईट मॅनेजर’साठी मनोजला इतर प्रोजेक्टसच्या तारखा द्याव्या लागणार होत्या. त्यामुळं मनोजनं यातून बाहेर पडणंच पसंत केलं. मनोज सध्या उत्तराखंडमध्ये एका चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करतोय. त्यानंतर तो आपल्या उर्वरीत प्रोजेक्टसवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं समजतं.

    या सिरीजमध्ये जॅानाथन पाईन यांची भूमिका हृतिक रोशन साकारत असून, सध्या मनोजला पर्याय शोधण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. मनोजच्या जागी कोणत्या अभिनेत्याची वर्णी लागते ते पहायचं आहे.