स्पर्धेने आत्मविश्वास वाढला – पूजा बिरारी

कम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण घेणाऱ्या पुजाने प्रशांत दामले फॅन्स फाऊंडेशनमध्ये सहभाग घेतला आणि तिचा नाटकांचा प्रवास सुरू झाला. दोन वर्षात पुजाने अनेक नाटकांमधून कामं केली. त्यानंतर ‘साजणा’ या मालिकेतून पूजाच्या कामाचा श्रीगणेशा झाला. या प्रवासाबद्दल अभिनेत्री पूजा बिरारीने नवराष्ट्रशी केलेली ही खास बातचीत.

    स्टार प्रवाहवर ‘स्वाभिमान’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  अस्तित्वाचा शोध घेऊ पाहाणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची ही गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळतेय. एका छोट्या गावात लहानाची मोठी झालेल्या पल्लवीचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे. स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येय कश्या पद्धतीनं गाठते हे या मालिकेतून स्वाभिमान लगडणार आहे. पल्लवीच्या भूमिकेत दिसणारी पूजा बिरारी ही अभिनेत्रीही काहीशी अशीच आहे. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत पूजाने मुंबई गाठली आणि सुरू झाला तीचा प्रवास. आपल्या या प्रवासाबद्दल पूजा भरभरून बोलते.

     

    पहिली ऑडिशन नेहमीच खास

    पहिली ऑडिशन माझ्यासाठी नेहमीच खास असणार आहे. कारण मुंबईतलं काहीच माहित नसताना मुंबईत येऊन ही ऑडिशन मी दिली होती. माझ्या हातात स्क्रीप्ट आली. माला तो सातारकडचा हेल पटकन पकडता आला. त्यामुळे त्या भूमिकेला आवश्यक असलेली ऑडिशन माझी झाली होती. पण तरीही मला अपेक्षा नव्हती. पुर्णपणे त्याबद्दल विसरले होते. पण त्यानंतर लगेचच दुसऱ्या राऊंडसाठी फोन आला आणि माझं सिलेक्शन ‘साजणा’ या मालिकेसाठी झालं. त्या नंतर प्रोमो शूट झाला. त्यामुळे ती मालिका, ते ऑडिशन माझ्यासाठी कायमच खास ठरणार आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Pooja Birari Official (@biraripooja)

     

    माझ्या जवळची भूमिका

    पण स्वाभिमान मालिकेतील भूमिका माझ्यासाठी खास आहे. कारण साजणानंतर अशाच भूमिकेच्या शोधात मी होते. पल्लवी नावाची ती भूमिका आहे. तिची स्वप्न, तिची जिद्द या सगळ्याचा प्रवास म्हणजे स्वाभिमान. साजणा मालिकेतील भूमिकेपेक्षा ही भूमिका विरोधी आहे. पल्लवी खूप स्पष्टवक्ती आहे, स्वत:साठी निर्णय घेणारी आहे. त्यामुळे हे सगळं एखाद्या वाक्यापेक्षाही माझ्या वागण्यातून दिसलं पाहिजे याकडे मी जास्त लक्ष दिलं.

    शेवटच्या उत्तराने आयुष्य बदललं

    साजणा मालिकेच्या आधी मी ‘मिस महाराष्ट्र’ या स्पर्धेत भाग घेतला होता. त्या आधीही मी एक- दोन ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला पण ‘मिस महाराष्ट्र’ ने आत्मविश्वास आणखी वाढला. कारण ठरलं ते शेवटचं उत्तर. अशी स्पर्धा म्हटलं की इंग्रजी भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण मी खूप आधीच ठरवलं होतं की काहीही झालं तरी मराठी भाषेतूनच उत्तर द्यायचे. स्पर्धेची शेवटची आणि महत्त्वाची फेरीत मी दिलेल्या त्या मराठी उत्तरामुळे ‘मी मिस’ महाराष्ट्र झाले.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Pooja Birari Official (@biraripooja)

     

    घरच्यांचा पाठिंबा

    जरी मी कम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण घेतलं तरी मला लहानपणापासूनच हिरोईन व्हायचं होतं. मला घरूनही कधीच या गोष्टीला विरोध झाला नाही. आई- बाबांनी कायमच पाठिंबा दिला. मी भरतनाट्यम शिकले. नाटकात काम केलं. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. पण नेहमीच घरच्यांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला. त्यामुळे ग्रॅज्यूएशन झाल्यानंतर आई- बाबांनी मला सांगितलं की तूला हव्या त्या क्षेत्रात तू काम करू शकतेस. कायमच मला घरून पॉझिटीव्ह एनर्जी मिळाली. या लॉकडाऊनच्या काळात मी घरी होते तेव्हाही कधीच घरच्यांकडून मला कामाबद्दल विचारलं गेलं नाही. एकूणच आज मी जे हे काम करू शकतेय ते केवळ माझ्या घरच्यांमुळे.

    हसल्या फुलक्या वातावरणात काम

    साजणा या मालिकेच्या मी एकदीच नवीन होते. शुटींगला १२ तासांची शिफ्ट असते हे ही मला माहित नव्हतं. पण सेटवर मला कधीच मी नवीन आहे असं जाणवू दिलं नाही. ती संपूर्ण टीमच कमाल होती. त्यांच्याशी जोडलेलं नातं आजही टिकून आहे. कारण त्या सेटवर मी खूप शिकले. त्याचबरोबर मालिकेच्या सेटवर म जेव्हा आले तेव्हा थोडा का होईना माझ्याकडे अनुभव होता. पण या सेटवर खूप दिग्गज कलाकार आहे. अनेक वर्षाचा त्यांच्याकडे अनुभव आहे. पण त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून हे कधीच जाणवलं नाही. सेटवर खूप हसत खेळत वातावरण असतं. प्रत्येत सीनमध्ये एकमेकांना सांभाळून घेत काम चालतं. एका प्रोमो शूटनंतर आमचं एक कुटुंब झालं.