vivek oberoy

विवेकनं नायकी भूमिकांसोबत खलनायकी व्यक्तिरेखांच्या माध्यमांतूनही रसिकांचं मनोरंजन केलं आहे. वास्तवात गुड बॅाय असलेल्या विवेकचं खरं रूप कोरोनाच्या निमित्तानं जगासमोर येत आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बॅालिवूडमधील स्टार्स गरजूंच्या मदतीसाठी धावून येत आहेत. पर्यावरण आणि मानवतेसाठी नेहमी कार्यरत असणाऱ्या विवेक ओबेरॅायनंही कोरोनाग्रस्तांना मदत केली आहे. डॅा. विवेक बिंद्रा यांच्यासोबत त्यानं ‘आय अॅम आॅक्सिजन मॅन’ हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी निधी उभारण्यात येत आहे. यासाठी विवेकनं स्वत: पुढाकार घेत २५ लाख रुपयांचा निधी डोनेट केला आहे.

    विवेकनं नायकी भूमिकांसोबत खलनायकी व्यक्तिरेखांच्या माध्यमांतूनही रसिकांचं मनोरंजन केलं आहे. वास्तवात गुड बॅाय असलेल्या विवेकचं खरं रूप कोरोनाच्या निमित्तानं जगासमोर येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका खूप लोकांना बसला आहे. यातून सावरण्यासाठी वैद्यकीय स्वरूपातील मदतीसोबत आॅक्सिजनच्या माध्यमातूनही मदत करणं गरजेचं आहे. यासाठीच ‘आय अॅम आॅक्सिजन मॅन’ची सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत दिल्लीमध्ये २०० मोफत बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

    यासोबतच विवेकनं शेकडो गरीब मुलांच्या फ्री हार्ट सर्जरीज केल्या आहेत. इतकंच नव्हे तर त्यानं कॅन्सरशी लढा देणाऱ्या जवळपास अडीच लाख मुलांचा जीव वाचवला आहे. २२०० लहान मुलींना देहविक्रयाच्या दुष्टचक्रातून सोडवलं आहे. ५० मुलं स्कॅालरशीप्सच्या माध्यमातून विदेशात शिक्षण घेत आहेत.