oscar award

या पुरस्कारासाठीची नामांकनं आधीच जाहीर झालेली आहेत. ती oscar.com या ऑस्करच्या ऑफिशिअल वेबसाईटवर बघता येतील. त्याचसोबत ऑस्करच्या विविध सोशल मीडिया अकाऊंट्सवरही या नामांकनांची यादी मिळेल.

    यंदाच्या वर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ९३ वा अकॅडमी पुरस्कार सोहळा व्हर्चुअल पद्धतीने होणार आहे. जगभरातल्या प्रेक्षकांना हा सोहळा लाईव्ह बघता येणार आहे. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्याचे होस्ट असणार आहेत अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती गायक निक जोनस.

    या पुरस्कारासाठीची नामांकनं आधीच जाहीर झालेली आहेत. ती oscar.com या ऑस्करच्या ऑफिशिअल वेबसाईटवर बघता येतील. त्याचसोबत ऑस्करच्या विविध सोशल मीडिया अकाऊंट्सवरही या नामांकनांची यादी मिळेल.

    ऑस्कर पुरस्कार सोहळा आज म्हणजे रविवारी रात्री पार पडणार आहे. मात्र भारतीय वेळेनुसार हा सोहळा उद्या म्हणजे २६ तारखेला पहाटे ५.३० वाजल्यापासून सकाळी८.३० वाजेपर्यंत चालेल. हा सोहळा ऑस्करच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुन oscars.com वरुन पाहता येणार आहे. तसंच ऑस्करच्या युट्युब चॅनेलवरुनही हा सोहळा पाहता येईल. अकॅ़डमीच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुनही हा सोहळा दाखवण्यात येणार आहे.