१०० रूपये मानधनावर सुरू झाली भाऊ कदमच्या करियरला सुरूवात, आता एका एपिसोडसाठी घेतो….

सुरुवातीला नाटकात काम करताना भाऊला १०० रुपये मिळायचे. नंतर १५०, २५०, ३५०, ७५० एवढं मानधन मिळायला लागलं.

    आज कॉमेडियन भाऊ कदमने मराठी प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची जागा निर्माण केली आहे. आज भाऊ सगळ्यांचा लाडका झाला आहे. आपली धम्माल विनोदबुद्धी आणि अचूक टायमिंगने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणा-या भाऊंचा अंदाजाने महाराष्ट्राला वेड लावलं. पण हिच कॉमेडी सादर करण्यासाठी भाऊ कदम एका एपिसोडसाठी किती मानधन घेतो हे तुम्हाला माहितेय का?

    भाऊ कदमने नाटकातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली. अनेक नाटकांमधून त्याने भूमिका साकारल्या. जाऊ तिथे खाऊ हे नाटक त्याकाळी खूप गाजलं. या नाटकामुळे भाऊच्या कारकिर्दीला दिशा मिळाली असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

    सुरुवातीला नाटकात काम करताना भाऊला १०० रुपये मिळायचे. नंतर १५०, २५०, ३५०, ७५० एवढं मानधन मिळायला लागलं. त्यातून घर संसाराचा गाडा कसाबसा चालायचा. आज त्याच भाऊ कदम  एका एपिसोडसाठी ऐंशी हजार रुपये घेतात, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

    भाऊ कदम यांचे बालपण मुंबईतील वडाळा येथील बीपीटी क्वॉर्टर्समध्ये गेलं. त्यांचे शालेय शिक्षण देखील वडाळ्याच्याच ज्ञानेश्वर शाळेत झालं. वडिलांच्या अकाली निधन झाल्यानंतर भाऊंना वडाळ्यातील जागा सोडावी लागली. त्यानंतर ते कुटुंबियांसमवेत डोंबिवलीत राहायला गेले. परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने त्यांनी अनेक छोटी-मोठी कामे केली. पण अभिनय हे नेहमीच त्यांचे पहिले प्रेम होते.