पोर्नोग्राफी कंटेंट निर्मिती केल्याबद्दल अटकेत असलेला शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा नेमका आहे कोण?

इंटरनेटचा वापर वाढल्यानंतर अशा प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयटी अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती.

    पोर्नोग्राफी कंटेंट निर्मिती केल्याचा आरोप करत अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना काल रात्री मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अटक केली आहे. राज कुंद्रा याच्याविरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पोर्नोग्राफीक कंटेट बनवल्याच्या आणि तो अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्यात आयटी अ‍ॅक्टसोबतच भारतीय दंडविधान (आयपीसी) च्या अनेक कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंद होतो. इंटरनेटचा वापर वाढल्यानंतर अशा प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयटी अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती.

    ही शिक्षा होऊ शकते

    १. अनेक वर्ष होऊ शकतो तुरूंगवास

    २. २००८ च्या कलम ६७(ए), आयपीसीचे कलम २९२, २९३, २९४, ५०० आणि ५०९ अन्वये शिक्षा

    ३. ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दहा लाख रुपये दंड

    ४. ७ वर्षांपर्यंत शिक्षेत होऊ शकते वाढ

    काय आहे  ‘अँटी पोर्नोग्राफी लॉ’

    अँटी पोर्नोग्राफी लॉ नुसार लैंगिक कृती आणि नग्नतेवर आधारित फोटो, व्हिडीओ, टेक्स्ट, ऑडिओ आणि इतर साहित्याची निर्मिती करणे. तसेच याप्रकारच्या कंटेन्टचे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित करणे गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीचे नग्न किंवा अश्लिल व्हिडीओ तयार करणे किंवा असा एमएमएस बनवून ते इतरांपर्यत पोहचवणाऱ्या लोकांवर या कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल होतो