लग्नाच्या १३ वर्षांनंतर सैफ- अमृता वेगळे झाल्यावर साराने विचारलेला ‘हा’ प्रश्न, त्यानंतर साराने दाखावलेला समजुदारपणा तुम्हाला भावेल!

दोघे एकत्र राहून कधी आनंदी राहू शकत नव्हते आणि ही गोष्ट त्यांना कळून चुकली होती. त्यामुळे ते वेगळे झाले त्यात काहीच चुकीचे नाही.

  अभिनेता सैफ अली खान बऱ्याचदा त्याच्या पहिल्या लग्नामुळे चर्चेत येतो. सैफने त्याच्या वयापेक्षा १२ वर्षे मोठी असणारी अमृता सिंगसोबत कुटुंबाला न सांगता लग्न केलं होतं. लग्नाच्या वेळी तो फक्त २० वर्षांचा होता. हे लग्न पुढे फार काळ टिकू शकलं नाही आणि लग्नाच्या १३ वर्षानंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

  सैफ अली खान आणि अमृता सिंगला दोन मुले आहेत ते म्हणजे सारा अली खान आणि इब्राहिम अली खान. सारा आता बॉलिवूडमधील अभिनेत्री आहे. एका मुलाखतीत जेव्हा सारा अली खानला विचारण्यात आले होते की तू तुझ्या आईला विचारले होतेस का की त्यांनी सैफसोबत लग्न का केले होते?. त्यावर सारा म्हणाली होती की, हो मी त्यांना विचारले होते आणि म्हटले होते जेव्हा तुम्ही २६ वर्षांच्या होत्या तेव्हा सैफ वयाने खूप लहान होते मग तुम्ही त्यांच्याशी लग्न कसे केले. मग मी विचार केला की जर त्यांच्यात प्रेम नसते तर मी कशी जन्माला आले असते.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

  सारा पुढे म्हणाली होती की, असे घर काय कामाचे जिथे लोक आनंदी नाहीत. माझे पालक वेगवेगळे व्यक्ती असून त्यांची वेगळी व्यक्तिमत्त्व आहेत. दोघे एकत्र राहून कधी आनंदी राहू शकत नव्हते आणि ही गोष्ट त्यांना कळून चुकली होती. त्यामुळे ते वेगळे झाले त्यात काहीच चुकीचे नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

  अमृता सिंगला घटस्फोट दिल्यानंतर सैफ अली खानने २०१२ साली करीना कपूरसोबत लग्न केले होते. या लग्नाला सारादेखील उपस्थित होती. लग्नाला उपस्थित राहण्यासाठी साराची आई अमृता सिंगनेच तिला तयार केले होते.