kranti redkar and sameer wankhede

काल गोरेगावमध्ये एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडेंच्या टीमवर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर अनेकांनी त्यांची पत्नी क्रांती रेडकरकडे त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. याबद्दल क्रांतीने सोशल मीडियावर सगळ्यांचे आभार मानले आहेत.

मुंबई : ड्रग पेडलरला पकडायला एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर गोरेगावमध्ये हल्ला(attack on ncb team) करण्यात आला. यात एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे(sameer wankhede) आणि त्यांच्या टीमचा समावेश होता. या हल्ल्यात वानखेडेंसह अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. जखमी अधिकाऱ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर –वानखेडे (Kranti Redkar) हिला मेसेज आणि फोन करून अनेकांनी समीर वानखेडेंच्या तब्येतीबाबत चौकशी केली. त्याबद्दल क्रांती रेडकरने सगळ्यांचे आभार मानले आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट टाकून तिने लोकांचे आभार मानले आहेत.


क्रांती रेडकरने लिहीलं आहे, ”तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभार. समीर वानखेडे यांची तब्येत ठीक आहे. आमच्या घरातील सर्वच कुटुंबीय त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. एनसीबीच्या संपूर्ण टीमला कडक सॅल्यूट. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.”