पुन्हा मावशी झाले… करिश्माने सोशल मीडियावर केला आनंद व्यक्त, करिनासाठी केली खास पोस्ट!

करिश्मा कपूरने करीनाच्या बालपणीचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. ” हा माझ्या बहिणीचा फोटो आहे जेव्हा तिचा जन्म झाला होता ; आता ती पुन्हा एकदा आई झालीय आणि मी पुन्हा एकदा मावशी झालेय” असं म्हणत करिश्माने आनंद व्यक्त केलाय.

  करिना कपूरने काल सकाळी दुसऱ्या बाळाला जन्म दिला. सैफ अली खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘its a boy..’ अशी पोस्ट करत चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. या बातमीनंतर चाहत्यांसोबतच बी टाऊनच्या अनेक सेलिब्रिटींनी करीना आणि सैफला शुभेच्छा दिल्या आहेत.तर करीना कपूरची बहिण अभिनेत्रा करिश्मा कपूरने अनोख्या स्टाईलने लाडक्या बेबोला शुभेच्छा देत आनंद व्यक्त केलाय.

  करिश्माची खास पोस्ट

  करिश्मा कपूरने करीनाच्या बालपणीचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. ” हा माझ्या बहिणीचा फोटो आहे जेव्हा तिचा जन्म झाला होता ; आता ती पुन्हा एकदा आई झालीय आणि मी पुन्हा एकदा मावशी झालेय” असं म्हणत करिश्माने आनंद व्यक्त केलाय.

  करिश्माने शेअर केलेल्या फोटोवर दिया मिर्झा, पॅशन डिझायनर मनीश मल्होत्रा यांनी कमेंट केल्या आहेत. तर बहिण रिद्धिमा कपूरला देखील करिश्मानं खास शुभेच्छा दिल्या होत्या. लहानपणीचा फोटो शेअर करत करिश्माने जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. या फोटोत लहानगी करिना झोपलेली दिसतेय.