देव आणि सोनाक्षीच्या वैवाहिक जीवनात नवीन वळण, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!

कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी ही मालिका आता एक विवाहित जोडपे म्हणून तसेच माता-पिता म्हणून देव आणि सोनाक्षी यांच्यातील बदलत्या नात्याचा शोध घेते.

    एक ब्रॅंड म्हणून वैविध्यपूर्ण, दर्जेदार आणि मर्यादित भागांच्या मालिका सादर करण्याबद्दल सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनची ख्याती आहे. कुछ रंग प्यार के ऐसे भी ही एक अत्यंत लाडकी मालिका होती. चाहत्यांकडून #देवाक्षी नावाने संबोधल्या जाणार्‍या, या मालिकेतील देव आणि सोनाक्षी यांच्या जोडीने लोकांना भुरळ घातली होती. त्यातील गोष्ट पुढे नेत कुछ रंग प्यार के ऐसे भी – नई कहानी ही मालिका आता एक विवाहित जोडपे म्हणून तसेच माता-पिता म्हणून देव आणि सोनाक्षी यांच्यातील बदलत्या नात्याचा शोध घेते. बियॉन्ड ड्रीम्स एन्टरटेन्मेंट प्रा. लि. द्वारा निर्मित ही मालिका सुरू होत आहे.

    देव आणि सोनाक्षीने यापूर्वी प्रेक्षकांना विविध अनुभव दिले आहेत- अनुरूपता, समजूतदारपणा, प्रेम, तडजोड, संताप, दुरावा आणि पालकत्व. पहिल्या सीझनमध्ये त्या दोघांची भेट होतेते प्रेमात पडतात आणि एकत्र येण्यासाठी देवची पझेसिव्ह आई- ईश्वरी हिच्या सकट सर्व अडथळ्यांना तोंड देतात हे दाखवले होते. दुसर्‍या भागात प्रेक्षकांनी पाहिले की देव आणि सोनाक्षी वेगवेगळ्या भाव-भावना, अनुरूपता, सुसंवाद, तडजोड आणि पालकत्व व त्यांच्याशी निगडीत समस्यांमधून कसे मार्ग काढतात.

    या सीझनमध्ये देव आणि सोनाक्षीअनपेक्षित परिस्थितीत आपल्या नात्यामधील सळसळतेपण कसे जिवंत ठेवायचे या समस्येला तोंड देताना दिसतील. या नागमोडी रस्त्यावरून जाताना त्यांचे नाते सुखरूप पार होईल की त्यात दुरावा निर्माण होईल हे प्रेक्षकांना बघायला मिळेल.  सुप्रसिद्ध अभिनेता शहीर शेख आणि एरिका फर्नांडिस अनुक्रमे देव आणि सोनाक्षीच्या भूमिकांमध्ये तर सुप्रिया पिळगावकर देवची आई ईश्वरी हिच्या भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे.