‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत सुप्रिया पिळगांवकरने साकारलेल्या आईचं होतय प्रचंड कौतुक!

माझ्या मते, प्रेम आणि काळजी दाखवण्याची प्रत्येक आईची आपली खास पद्धत असते. शेवटी एका आईची इच्छा आपल्या मुलानं आनंदात असावं आणि जीवनात त्याची भरभराट व्हावी हीच तर असते.

    सुप्रिया पिळगांवकर यांनी ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ या मालिकेत साकारलेल्या आईचं प्रचंड कौतुक होत आहे. या मालिकेत त्यांनी साकारलेल्या ईश्वरीमध्ये एका वेगळ्या छटेची आई दिसते. पडद्यावर आई साकारताना आणि प्रत्यक्षात मातृत्वाचा अनुभव घेतानाच्या भावना व्यक्त करताना सुप्रिया म्हणाल्या की, एक आई म्हणून ईश्वरी आपल्या मुलांवर सारखंच प्रेम करते, पण आपणा सर्वांना माहीतच आहे की, देव (शहीर शेख) कडे तिचा विशेष कल आहे. आपल्या आणि आपल्या मुलाच्या नात्यात ती कोणालाच येऊ देत नाही.

    माझ्या मते, प्रेम आणि काळजी दाखवण्याची प्रत्येक आईची आपली खास पद्धत असते. शेवटी एका आईची इच्छा आपल्या मुलानं आनंदात असावं आणि जीवनात त्याची भरभराट व्हावी हीच तर असते. देवबद्दल ईश्वरीला हेच वाटत असतं. वास्तवातील आईबाबत त्या म्हणाल्या की, मला एक मुलगी आहे आणि तिनं आई म्हणून माझी निवड केली याबद्दल मला कृतज्ञता वाटते. तिच्या बाबतीत मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे.

    तिच्या जीवनात ती जे निर्णय घेते, त्यात मी तिच्यावर विश्वास ठेवते आणि तिला आधार देते. ती एक सुंदर आणि स्वतंत्र स्त्री झालेली पाहताना माझ्या मनाला खूप आनंद होतो. आपल्याला हे माहीत असते की एक ना एक दिवस आपली मुले पाखरासारखी घरट्यातून उडून जाणार आहेत, पण तरीही एका आईसाठी ती मुले नेहमीच जीवाभावाची राहतात.