क्वारंटाईन या विषयावर भाष्य करणारा  लघुपट ”कुलूपबंद” यु्ट्यूबवर प्रदर्शित

आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना अगदी साध्या-सोप्या भाषेत मांडण्याची ताकद लघुपटात असते. हे लघुपट मनोरंजन तर करतातच त्याचबरोबर काही तरी सामाजिक संदेशही देऊन जातात. थोड्याशा कालावधीत बरेच काही

  आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटना अगदी साध्या-सोप्या भाषेत मांडण्याची ताकद लघुपटात असते. हे लघुपट मनोरंजन तर करतातच त्याचबरोबर काही तरी सामाजिक संदेशही देऊन जातात. थोड्याशा कालावधीत बरेच काही सांगून जातात. त्यांच्या विषय आणि आशयामध्ये एवढी ताकद नक्कीच असते. सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षक जुन्या मालिका, चित्रपट तसेच वेबसीरिज पाहण्यात दंग आहेत. शिवाय उत्तमोत्तम लघुपटही प्रेक्षक पाहत आहेत. अशातच लॉकडाऊनमध्ये ‘कुलूपबंद’ नावाचा लघुपट युट्युबवर प्रदर्शित झाला आहे.

आशिष निनगुरकर याने या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. आशिषने याआधी काही लघुपट व माहितीपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच काही चित्रपटांचे व लघुपटांचे लेखनही त्याने केले आहे.त्याने लॉकडाऊनच्या काळात याआधी दिग्दर्शित केलेल्या ‘नियम’ या लघुपटाने बऱ्याच चित्रपट महोत्सवांमध्ये बाजी मारली आहे. या लघुपटाची कथा ‘नियम पाळा, कोरोना टाळा’ यावर आधारित होती. आता युट्युब वर प्रदर्शित झालेल्या ‘कुलूपबंद’ या लघुपटातून ‘सुरक्षित अंतर पाळा, कोरोना संसर्ग टाळा’ या महत्वाच्या विषयावर भाष्य करण्यात आले आहे.या लघुपटाचे लेखन व छायाचित्रण आशिष निनगुरकर यांचे असून संकलन अभिषेक लगस यांनी केले आहे.या लघुपटात स्वरूप कासार व अनुराग निनगुरकर यांनी भूमिका केल्या आहेत.लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून हा लघुपट घरच्याघरी तयार करण्यात आला आहे.क्वारंटाईनच्या अत्यंत महत्वाच्या विषयावर हा लघुपट बेतलेला आहे.महत्वाच्या सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या या लघुपटाचे विशेष कौतुक होत आहे.