‘अश्लील नाही काही तर न्यूड फिल्म बनवायचो’, राज कुंद्रा प्रकरणात मित्राचा मोठा खुलासा!

अश्लील सिनेमांची निर्मिती करण्याचे आरोप असलेल्या तनवीर हाशमीने राज कुंद्राबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. तनवीर हाशमी सध्या जामिनावर बाहेर आहे.

    अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणी न्यायालयाने राज कुंद्रा आणि रायन थोर्पे यांना २७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. १९ जुलैला राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक गोष्टींचा उलगडा होवू लागला आहे. तर राज कुंद्राच्या कंपनीतील चार कर्मचाऱ्यांनी त्याच्याविरोधात साक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे.

    तनवीर हश्मीने केला मोठा खुलासा

    अश्लील सिनेमांची निर्मिती करण्याचे आरोप असलेल्या तनवीर हाशमीने राज कुंद्राबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. तनवीर हाशमी सध्या जामिनावर बाहेर आहे. मुंबई क्राइम ब्रांचने तनवीर हाशमीला चौकशीसाठी बोलावलं होतं. यावेळी आपला राज कुंद्राशी थेट संबंध नसल्याचं म्हटलं. तसचं राज कुंद्रा अश्लील नव्हे तर न्यूड फिल्म बनवायचा असा खुलासाही तनवीरने यावेळी केला.

    तनवीर म्हणाला, ” मला क्राइम ब्रांचने चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र मी क्राइम ब्रांचला स्पष्ट केलंय मी आजवर राज कुंद्राला भेटलो नाही. तनवीरला त्याने कशाप्रकराचा कंटेंट बनवला हे विचारण्यात आलं होतं. यावर तो म्हणाला ” आम्ही २०-२५ मिनिटांच्या शॉर्ट फिल्म बनवायचो. ज्यात न्यूडिटी होती मात्र तुम्ही त्याला अश्लील नाही म्हणू शकत. हा मात्र हे सॉफ्ट अडल्ट सिनेमा होते असं म्हणू शकतो.” असं आरोपी तनवीर हाशमी चौकशीत म्हणाला.