आपल्यासाठी तत्पर असणाऱ्यांना सेवेकरूंना मदत करणे हे कर्तव्य -कामगार दिनानिमित्त कलाकारांचे भावनिक आवाहन

मुंबई: महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने स्टेल्लारीया स्टुडिओस प्रस्तुत अमोल उतेकर यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेला तसेच किरण खोत यांच लेखन असलेला एक व्हिडिओ आपल्या भेटीला आला

 मुंबई: महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने स्टेल्लारीया स्टुडिओस प्रस्तुत अमोल उतेकर यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेला तसेच किरण खोत यांच लेखन असलेला एक व्हिडिओ आपल्या भेटीला आला आहे. कोरोनाने सगळीकडे धुमाकूळ माजवला आहे. नुसतच शहरात नाही तर प्रत्येकाच्या मनात, घरात अशांततेचा कल्लोळ पसरवला आहे. प्रत्येक जण स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी झटताना दिसतोय. आपल्यातीलच देव मग ते खाकी वर्दीतील पोलीस असो वा डॉक्टर परिचारिका असो आज आपल्यासाठी हे दिवस रात्र झटत आहेत. सोशल मीडियावर विविध कला क्षेत्रातील कलाकार निरनिराळ्या व्हिडीओच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग त्याचप्रमाणे स्वतःची काळजी कशा प्रकारे घेता येईल, याबाबत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवत आहेत.मात्र सोशल डिस्टन्सिंग सोबतच पोटाची खळगी भरायला आवश्यक अशी गोष्ट म्हणजेच पैसे.  आपल्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या सेवेकरूंना पैशांची कमतरता भासू नये. मग त्या कामवाल्या मावशी असो किंवा आपला प्रवास सुखकर करणारे चालक त्यांना उपाशी झोपायला लागू नये याची काळजी घेण हे आपलं आद्य कर्तव्य असायला हवे. अशी विनंती मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले,संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, राणी अग्रवाल, गौरव मोरे, नीता शेट्टी, अमोल उतेकर, प्रदीप मेस्त्री या व्हिडिओच्या मार्फत नागरिकांना करत आहेत.

 या व्हिडिओची लिंक –  https://youtu.be/oUreTcfwM_U