‘त्या’ अविस्मरणीय क्रिकेट मॅचला २० वर्ष पूर्ण, आजही ‘या’ खास नावाने एकमेकांना मारतात हाक!

आमिर म्हणतो, आमचा 'लगान-११' या नावाचा व्हॅाट्सअप ग्रुप आहे. आम्ही दरवर्षी न चुकता एकमेकांना भेटतो. आज २० वर्षे झाली आहेत, पण आजही आम्ही एकमेकांना रील नेमनेच बोलवतो.

    आजवर आमिर खाननं अभिनय केलेले बरेच चित्रपट स्मरणीय ठरले आहेत. यापैकी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचा ‘लगान’ माइलस्टोन ठरला आहे. थेट आॅस्कर दरबारी झेप घेणाऱ्या या चित्रपटानं केवळ प्रेक्षकांनाच नव्हे, तर कलाकार-तंत्रज्ञांनाही काही अविस्मरणीय क्षण दिले आहेत. ‘लगान’ प्रदर्शित होऊन २० वर्षे पूर्ण झाल्यानं आमिर या चित्रपटाच्या आठवणीमध्ये रमल्याचं पहायला मिळत आहे.

    आमिर म्हणतो, आमचा ‘लगान-११’ या नावाचा व्हॅाट्सअप ग्रुप आहे. आम्ही दरवर्षी न चुकता एकमेकांना भेटतो. आज २० वर्षे झाली आहेत, पण आजही आम्ही एकमेकांना रील नेमनेच बोलवतो. दयाशंकर पांडेला मी आजही गोली म्हणूनच बोलावतो, लाखांला लाखां म्हणूनच बोलावतो… आम्ही मूळ नावानं कोणालाही बोलावत नाही. ‘लगान’मधल्याच नावानं बोलावतो. हे मुद्दाम केलं जात नसू, आपसूकच होऊन जातं.

    यासाठी कुणालाही विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. या ग्रुपवरील सर्वजण मलादेखील भुवनच बोलवतात, आमीर म्हणत नसल्याचं सांगत त्यानं ‘लगान’ची आठवण चाहत्यांसोबत शेअर केली आहे.