‘लागिरं झालं जी’ या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके काळाच्या पडद्याआड

'लागिरं झालं जी' (lagir zhal ji) या लोकप्रिय मराठी मालिकेतील जिजीचे पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके ( Actress Kamal Thoke)  यांचं शनिवारी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ऐन दिवाळीत त्यांचं निधन झाल्याने मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे.

‘लागिरं झालं जी’ (lagir zhal ji) या लोकप्रिय मराठी मालिकेतील जिजीचे पात्र साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके ( Actress Kamal Thoke)  यांचं शनिवारी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ऐन दिवाळीत त्यांचं निधन झाल्याने मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे. मुलगा सुनिल (Sunil) याच्याकडे बंगळुरू येथे राहण्यास जिजी गेल्या होत्या. परंतु १४ नोव्हेंबरला बंगळुरू (Bangalore) या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर कराड येथील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या जाण्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

मराठी कला क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी मुख्याध्यापिका अशी कमल ठोके यांची ओळख होती. लागिरं झालं जी या प्रसिद्ध मालिकेतून कमल ठोके यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली होती. १९९२ मध्ये चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला पण कराडसारख्या ठिकाणी राहून आणि शिक्षकाची नोकरी करून ते काम करणे अवघड होते. त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी चित्रपट क्षेत्रात नव्याने पाऊल ठेवले.

बाबा लगीन,सासर माहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. कमल ठोके यांच्या पश्चात मुलगा, सून नातवंडं, मुलगी असा परिवार आहे.