५ जुलैपासून ‘लक्ष्मी घर आयी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

अनपेक्षित परिस्थिती आणि अनोळखी कुटुंबाशी जळवून घेण्यासाठी एखादी मुलगी कशी उत्साही असेल याचं चित्रण या शोमध्ये करण्यात येणार आहे.

    ‘स्टार भारत’ वाहिनीवर ५ जुलैपासून ‘लक्ष्मी घर आयी’ ही नवीन मालिका प्रसारीत होणार आहे. या मालिकेत अनन्या खरे, अक्षित सुखीजा आणि सिमरन परींजा या कलाकारांच्या मध्यवर्ती भूमिका मालिकेमध्ये आहेत. या मालिकेच्या माध्यमातून हुंडा प्रथेवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या शोची कथा एका अशा मुलीची आहे की, जी लग्नानंतर नवऱ्याच्या घरी येताना धन-दौलत आणि संपत्तीऐवजी भरपूर प्रेम आणि आपलेपणा घेऊन येते, जी गोष्ट नवऱ्याच्या कुटुंबाला नाराज करणारी ठरते.

    अनपेक्षित परिस्थिती आणि अनोळखी कुटुंबाशी जळवून घेण्यासाठी एखादी मुलगी कशी उत्साही असेल याचं चित्रण या शोमध्ये करण्यात येणार आहे. या मालिकेत मैथीलीचा प्रवास पहायला मिळेल. या मालिकेबाबत अक्षित म्हणाला की, छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणाता चांगला शो ठरू शकला नसता. पुनरागमाबाबत मी खरोखर उत्साही आहे.

    उत्कृष्ट कथानक असलेल्या या शोमध्ये मुख्य भूमिका करणं हा एक सन्मान आहे. या शोमधून मुलगी उत्तरदायित्व नसल्याचा संदेश समाजात पसरेल, अशी आशा व्यक्त करतो.